25 वर्षानंतर महेश भट्टची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा येणार पडद्यावर

आलिया भट्ट देखील असणार या सिनेमांत 

25 वर्षानंतर महेश भट्टची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा येणार पडद्यावर  title=

मुंबई : महेश भट्टच्या सडक 2 या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. अशी चर्चा होते की, संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्यासोबत आलिया भट्ट असणार आहे. सडक 2 संदर्भात महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. तरण आदर्श ट्विट सडक 2 रिलीज डेट शेअर केली आहे. महेश भट्टचा सिनेमा 15 नोव्हेंबर 2019 रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. 

25 वर्षापूर्वी 20 डिसेंबर 1991 संजय दत्त आणि पूजा दत्तची 'सडक' हा सिनेमा रिलीज झाला होता. आता या सिनेमाचा सिक्वल बनवला जात आहे. सिनेमात आलिया भट्ट देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला आलिया भट्टसोबत महेश भट्टच्या ऑफिस बाहेर पाहिलं जात आहे. या सिनेमाबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पूजा भट्टने एक पोस्ट शेअर केली आहे. सडक 2 हा सिनेमा 1991 मध्ये आलेल्या सडकचा सिक्वल आहे. सिनेमात संजय दत्त आणि पूजा भट्ट लीड रोलमध्ये आहे. असं सांगितलं जातं आहे की, पूजा या सिनेमांत अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी देखील साकारत आहे. 

जुन्या सिनेमाचं महेश भट्ट यांनी दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 1991 मध्ये रिलीज झालं आहे. संजय दत्तने एका युवकाची भूमिका साकारत आहे. संजय दत्त वैशा पूजा भट्टच्या प्रेमात पडतो.