मुंबई : ९० च्या दशकात संजय दत्त आणि माधुरी दीक्षितची जोडी केवळ रील लाईफमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिट ठरली होती. संजय दत्तदेखील त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. संजू बाबाच्या आयुष्यात अनेक मुली आल्या, पण माधुरी दीक्षितसोबतचं त्याचं नातं चर्चेत राहिलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'शानदार' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघंही एकमेकांच्या जवळ आले. एवढंच नाही तर एकदा संजय दत्तने असंही म्हटलं होतं की, जर त्याला एखाद्या अभिनेत्रीशी लग्न करायचं असेल तर तो माधुरी दीक्षितसोबत करेल.
त्याचबरोबर संजय आणि माधुरीने 'खलनायक' चित्रपटातही एकत्र काम केलं होतं. या सिनेमात माधुरी आणि जॅकी श्रॉफसोबत हे कपल असलं तरी, अभिनेत्री मात्र संजय दत्तच्या प्रेमात होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या दिवसांमध्ये त्यांच्या लग्नाच्या बातम्यादेखील चर्चेत होत्या. अशा परिस्थितीत 'खलनायक' चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांना या बातम्यांमुळे चित्रपटाचं नुकसान होण्याची भीती वाटू लागली.
याच कारणामुळे सुभाष घई यांनी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत करारही केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलं होतं की जोपर्यंत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत ते लग्न करणार नाहीत. खरंतर माधुरी आणि संजयचं लग्न झालं तर लोकांचं लक्ष चित्रपटावरून हटेल अशी भीती दिग्दर्शकाला वाटत होती. आणि म्हणूनच दिग्दर्शकाने त्यांच्या सोबत हा करार केला होता.
संजय दत्तच्या अटकेमुळे नातं तुटलं
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रेमाचा तो काळ होता. त्याचवेळी संजय दत्तला आर्म्स ऍक्ट अंतर्गत अटक करण्यात आली. त्यावेळी संजय दत्त तब्बल 16 महिने कारागृहात होता. या दरम्यान खलनायक सिनेमा रिलीज होऊन हिट देखील झाला.
माधुरीने आपला मार्ग बदलला
संजय दत्त अगदी कठीण प्रसंगातून जात होता मात्र तेव्हा माधुरीने त्याचा साथ दिली नाही. 16 महिने संजय कारागृहात होता मात्र माधुरी संजयला एकदा देखील भेटली नाही. याच कारणामुळे या दोघांच्या नात्यात दूरी निर्माण झाली.