अर्जून कपूरच्या लग्नाबाबत संजय कपूर म्हणाले....

कपूर कुटुंबामध्ये नुकतेच सोनम कपूरचे लग्न पडले आहे. 

Updated: Jun 12, 2018, 12:29 PM IST
अर्जून कपूरच्या लग्नाबाबत संजय कपूर म्हणाले....

मुंबई : कपूर कुटुंबामध्ये नुकतेच सोनम कपूरचे लग्न पडले आहे. आता पुढचा क्रमांक कोणाचा असेल? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. संजय कपूर यांनी नुकत्याच केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारा पुतण्या अर्जून कपूरच्या लग्नामधील एका खास गोष्टीबद्दल संकेत दिला आहे.  

संजय कपूरची खास पोस्ट 

अभिनेता संजय कपूर यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यादरम्यानचा एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये अर्जून कपूरचा 'भावनाशून्य' चेहरा पाहून त्या
च्या लग्नामध्येही आम्ही असेच कंटाळलेले राहणार आहोत असे म्हणत अर्जुन कपूरची टर उडवली आहे.  

 

 

That’s my expression when Arjun gets married #bored #getitoverwithchachu 

A post shared by Sanjay Kapoor (@sanjaykapoor2500) on

सोनम कपूरचे ग्रॅन्ड वेडींग 

8 मे 2018 रोजी अनिल कपूरची मुलगी सोनम ही उद्योगपती आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकली. सोनम कपूरच्या शाही सोहळ्यात कपूर कुटुंबीयांनी धम्माल मस्ती केली होती. 

अर्जुन कपूरने त्याच्या रिलेशनशीपबाबत कोणतेही संकेत अजून दिले नाहीत. मात्र भविष्यात अर्जून कोणासोबत लग्न करणार? कसा त्याचा लग्नसोहळा याबाबत आता कपूर कुटूंबीयांसोबत चाहत्यांच्या मनातही उत्सुकता आहे.