Sanjay Leela Bhansali चा मोठा निर्णय, चाहत्यांसाठी खास बातमी

चाहत्यांसाठी मोठी पर्वणी

Updated: Sep 27, 2021, 06:44 AM IST
Sanjay Leela Bhansali चा मोठा निर्णय, चाहत्यांसाठी खास बातमी

मुंबई : रामलीला : गोलियों की रासलीला, जोधा अकबर, पद्मावत, बाजीराव मस्तानी सारख्या सुपरहिट आणि बिग बजेटचे फिल्ममेकर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी. फिल्ममेकरने आता फिल्ममेकिंगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. संजय लीला भन्साळी आता OTT प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहेत. भन्साळीचा हा पहिला प्रोजेक्ट असू शकतो. 'हीरामंडी' ही भन्साळीची पहिली वेब सीरिज आहे. ही लवकरच रिलीज होणार आहे. 

भन्साळीने सांगितला 4 वर्षांचा हा किस्सा

संजय लीला भन्साळींनी शो बनवण्यासाठी आपली प्रेरणा शेअर केली आहे. पदार्पणाबद्दल बोलताना संजय म्हणाले की, मला आठवते जेव्हा मी चार वर्षांचा होतो आणि माझ्या वडिलांनी मला शूटवर नेले. ते म्हणाले की तुम्ही इथे बसा आणि मी माझ्या मित्रांना भेटून येतो. मी स्टुडिओच्या आत होतो आणि मला हे सर्व खूप आरामदायक वाटले.

शाळा, खेळाचे मैदान, चुलतभावाचे घर, मला ही जगातील सर्वात सुंदर ठिकाण वाटली. जेव्हा मी 25 वर्ष मागे वळून पाहतो, तेव्हा मला वाटते की ते माझ्यासाठी हे खूप मौल्यवान आहे. कारण तुम्हाला चित्रपट बनवण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. यामुळेच मी स्टुडिओशी जोडला गेलेलो आहे. कारण स्टुडिओचा मजला सर्वात जादुई आहे. हे माझे मंदिर आहे, हे माझे सर्वस्व आहे.

14 वर्षांपूर्वीची गोष्ट 

ते पुढे म्हणाले की, 'हिरामंडी' ही अशी गोष्ट होती जी माझा मित्र मोईन बेगने 14 वर्षांपूर्वी मला 14 पानांच्या कथेच्या रूपात दिली होती. अखेर आम्ही ती नेटफ्लिक्सला सादर केली. तेव्हा त्याला ते आवडले आणि वाटले की, यामध्ये खूप क्षमता आहे. हा प्रोजेक्ट खूप महत्वाकांक्षी आहे. यामधून वेश्यांची कथा मांडली आहे. सिनेमाच्या संगीत, कविता आणि नृत्य मधून त्यांच्या जगण्याची कला मांडली आहे.