CISF जवानानं कंगनाला कानशिलात लगावताच संजय राऊत थेट म्हणाले, 'मला कंगनासाठी...'

Sanjay Raut on Kanaga Ranaut and CISF Officer Incident :  संजय राऊत यांनी कंगना रणौतसोबत चंडीगढ विमानतळावर घडलेल्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दिक्षा पाटील | Updated: Jun 7, 2024, 02:46 PM IST
CISF जवानानं कंगनाला कानशिलात लगावताच संजय राऊत थेट म्हणाले, 'मला कंगनासाठी...' title=
(Photo Credit : Social Media)

Sanjay Raut on Kanaga Ranaut and CISF Officer Incident : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतसोबत चंडीगढ विमानतळावर अनपेक्षित घटना घडली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणात खूप चर्चा सुरु झाली होती. तर या प्रकरणात आता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगनानं या प्रकरणीनं व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत कंगनानं घडलेल्या संपूर्ण प्रकरणाविषयी सांगितलं होतं. कंगनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देताना दिसले. इतकंच नाही तर आता स्वत: संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे. 

हेही वाचा : CISF जवानानं का लगावली कानशिलात? कंगनानं स्वत: केला खुलासा

यावेळी संजय राऊत म्हणाले की 'जर त्या कॉन्स्टेबलनं असं सांगितलं असेल की तिची आई तिथे बसली होती, तर ते खरं आहे. तिची आई शेतकरी आंदोलनात सहभागी झाली असेल आणि अशात आईबद्दल कोणी चुकीचं बोलत असेल तर नक्कीच लोकांच्या मनात चीड येते, संताप येतो, क्रोध असतो. जर मोदीजी म्हणतात की कायद्याचं राज्य आहे तर कायदा हातात नाही घेतला पाहिजे. कॉन्स्टेबलनं तिच्या आईसाठी कायदा हातात घेतला. भारत मातासुद्धा त्यांची आई आहे आणि जे शेतकरी आंदोलनाला बसले होते, ते भारतमातेचे पुत्र होते, कन्या होत्या. जर कोणी भारतमातेचा अपमान केला असेल आणि कोणाला राग आला असेल तर मला असं वाटतं की त्याविषयी विचार केला पाहिजे. मला कंगनासाठी  सहानुभूती आहे. त्या खासदार आहेत, अशा प्रकारे खासदारांवर कोणी हात उचलू नये, तर देशात शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे.' 

काय होतं संपूर्ण प्रकरण?

कंगना रणौत ही फक्त अभिनेत्रीच नाही तर ती आता खासदार देखील झाली आहे. तर कंगनानं हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत कंगना बोलताना दिसते की 'मला अनेक हितचिंतकांचे आणि मीडिया मधील लोकांचे फोन येत आहेत. सगळ्यात आधी मी सुरक्षित आहे. मी ठीक आहे. आज चंडीगढ विमानतळावर जी घटना घडली आहे. ती घटना सुरक्षा तपासणी केल्यानंतर मी जशी तिथून निघाले. तेव्हा दुसऱ्या केबिनमध्ये जी महिला होती. जी CISF जवान होती. त्या महिलेनं माझ्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षाकाला तिथून पुढे जाण्यापर्यंत प्रतीक्षा केली. त्यानंतर पुढे येऊन त्यांनी माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर अपशब्द वापरले. त्यानंतर मी जेव्हा त्यांना विचारलं की असं का केलं? तर त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मी सुरक्षित आहे. पण मला एकच चिंता आहे की पंजाबमध्ये जो दहशतवाद आणि अतिरेक वाढतोय. आपण त्या सगळ्याला कसं हाताळायचं.'