CISF जवानानं का लगावली कानशिलात? कंगनानं स्वत: केला खुलासा

Why CISF Officer Slaped Kangana Ranaut Slaped : कंगना रणौतनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर कारण सांगत खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 6, 2024, 06:50 PM IST
CISF जवानानं का लगावली कानशिलात? कंगनानं स्वत: केला खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Why CISF Officer Slaped Kangana Ranaut Slaped : बॉलिवूड अभिनेत्री खासदार असलेल्या कंगना रणौतला चंडीगढ विमानतळावर CISF जवाननं कानशिलात लगावली आहे. या प्रकरणात सगळीकडे चर्चा सुरु असताना. सगळ्यांना प्रश्न पडला होता की हे सत्य आहे की नाही. तर यावर स्वत: कंगना रणौतनं खुलासा केला आहे. कंगना रणौतनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत त्या मागचं खरं कारण सांगितलं आहे. 

कंगनानं तिच्या आधीच्या ट्विटर आणि आताच्या X अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कंगना बोलते की मला अनेक हितचिंतकांचे आणि मीडिया मधील लोकांचे फोन येत आहेत. सगळ्यात आधी मी सुरक्षित आहे. मी ठीक आहे. आज चंडीगढ विमानतळावर जी घटना घडली आहे. ती घटना सुरक्षा तपासणी केल्यानंतर मी जशी तिथून निघाले. तेव्हा दुसऱ्या केबिनमध्ये जी महिला होती. जी CISF जवान होती. त्या महिलेनं माझ्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षाकाला तिथून पुढे जाण्यापर्यंत प्रतीक्षा केली. त्यानंतर पुढे येऊन त्यांनी माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर अपशब्द वापरले. त्यानंतर मी जेव्हा त्यांना विचारलं की असं का केलं? तर त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मी सुरक्षित आहे. पण मला एकच चिंता आहे की पंजाबमध्ये जो दहशतवाद आणि अतिरेक वाढतोय. आपण त्या सगळ्याला कसं हाताळायचं.

तर दुसरीकडे त्या महिला CISF जवानचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत ती महिला बोलते की ती म्हणाली होती ना की त्या आंदोलनात सगळे 100-100 रुपये घेऊन बसल्या होत्या. ही बसेल का तिथे... त्या आंदोलनात माझी आई बसली होती. 

हेही वाचा : कंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात?

आंदोलनाविषयी काय म्हणाली होती कंगना? 

कंगना रणौत त्या आंदोलन काळात सोशल मीडिया चांगली सक्रिय होती. तिनं या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकरणात कंगनाचं अनेक पंजाबच्या सेलिब्रिटींसोबत वाद -विवाद झाले होते. आता हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदार संघाची भाजपकडून जिंकलेली ती खासदार आहे. या मतदार संघासाठी कंगनासोबत कॉंग्रेस विक्रमादित्य सिंह देखील लढत होती. जे राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे सुपुत्र आहेत.