अमृता सिंग आणि अमिताभ यांच्या Kissing Scene मुळे साराला शाळेत अशी वागणूक

हे सर्व माझ्यासाठी खूप विचित्र होते...

Updated: Jan 23, 2022, 06:50 PM IST
 अमृता सिंग आणि अमिताभ यांच्या Kissing Scene मुळे साराला शाळेत अशी वागणूक title=

मुंबई : सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री अमृता सिंग यांचा 'मर्द' हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झाला होता. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटाने भरपूर कमाई केली तसेच अमिताभ बच्चन आणि अमृता सिंग यांच्या केमिस्ट्रीचीही खूप चर्चा झाली.

मात्र, या चित्रपटामुळे अमृता सिंगची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिला शालेय जीवनातच लाजीरवाणं व्हावं लागलं होतं आणि याबाबतचा खुलासा खुद्द सारा अली खानने केला होता.

सारा अली खान करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये वडील सैफ अली खानसोबत पोहोचली होती.

जेव्हा करण जोहरने सारा अली खानला विचारले, 'तिच्या आईचा असा कोणता चित्रपट आहे जो तिला अजिबात आवडत नाही? या प्रश्नावर सारा 'मर्द' असं म्हणाली. सारा म्हणाली, या चित्रपटामुळे मला अनेकदा लाजीरवाणं व्हावं लागलं आहे.

चित्रपटाच्या एका दृश्यात माझी आई वाळलेल्या गवताच्या ढिगाऱ्यात अमिताभ बच्चन यांना किस करते. मला शाळेत या सीनवर खूप चिडवले गेले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुलगी सारा अली खानचे म्हणणे ऐकल्यानंतर सैफ म्हणाला, 'अमिताभ बच्चन यांना किस करण्यात काय वाईट होतं?' यावर सारा म्हणाली, 'ती माझी आई आहे, हे सर्व माझ्यासाठी खूप विचित्र होते'.

सारा अली खान तिची आई अमृता सिंगच्या खूप जवळ आहे. दोघांचे क्यूट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अमृता आणि साराची मजबूत बाँडिंग स्पष्टपणे दिसत आहे.