अ‍ॅब्स दाखवण्यासाठी कितीवेळ श्वास थांबवणार! अंबानींच्या गणपतीत सारा ट्रोल

Sara Ali Khan Trolled : सारा अली खानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 8, 2024, 08:11 PM IST
अ‍ॅब्स दाखवण्यासाठी कितीवेळ श्वास थांबवणार! अंबानींच्या गणपतीत सारा ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Sara Ali Khan Trolled : अंबानी कुटुंब भारतीय संस्कृतीचा किती सन्मान करतं याविषयी कोणालाही काही सांगण्याची गरज नाही. कोणताही सण असो अंबानी कुटुंब मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. संपूर्ण बॉलिवूड हे यावेळी एकाच छताखाली आपल्याला पाहायला मिळतं. खरंतर सिद्धार्थ-कियारा, अनन्या, सारा अली खान आणि शनायाच्या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले. तर सारा अली खानच्या लूकनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

अंबानींच्या घरी आलेल्या पाहुण्यांमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते सारा अली खाननं. सारा अली खाननं भाऊ इब्राहिम अली खानसोबत एन्ट्री केली. सारा अली खाननं गोल्डन प्रिंट आणि जरी बॉर्डर असलेली मल्टी-कलर्ड लेहेंगा परिधान केला. गोल्डन ओढणी आणि गोल्डन जरी बॉर्डरसोबत पेयर केलं. पण फोटोज काढण्यासाठी सारा सारखं तिचं पोट आत घेताना दिसली, त्यावरून लगेच कळतं की पोज देण्यासाठी ती पोट आत घेते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

साराच्या या सगळ्या गोष्टी नेटकऱ्यांना खटकू लागल्या आहेत. अनेकांनी तिला म्हटलं की दिखावा करण्यासाठी काय गरजेचं आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केली. एक नेटकरी म्हणाला, 'श्वास थांबवून ठेवलाय, का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'श्वास न घेता पोट आत खेचते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जबरदस्ती सिक्स पॅक दाखवते.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अजून थोडा श्वास थांबवून अॅब्स दाखव.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ताई कधीपर्यंत श्वास थांबवणार आहेस.'

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी खूप सुंदर अशा पारंपारिक कपडे परिधान केले आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बॉलिवूडचे सगळ्यात स्टायलिश कपल पैकी एक आहेत. ते नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट होतात. अंबानींच्या घरात गणपती चतुर्थीच्या निमित्तानं कियारानं पांढऱ्या रंगाचा चूडीदार परिधान केला होता. 

हेही वाचा : Kasautii Zindagi Kay फेम अभिनेत्याचं निधन, अखेरची पोस्ट VIRAL

दरम्यान, सारा अली खाननं जेव्हा बाप्पासोबतचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिच्या या फोटोंवर कमेंट करत नेटकरी तिला आम्ही मुस्लिम मानतच नाही असं म्हणून लागेल. इतकंच नाही तर अनेकांनी तिला नरकात जागा मिळणार नाही. तर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.