गरीब महिलेला मदत करणाऱ्या Sara Ali Khan ची का उडवली जातेय खिल्ली?

सारा तिची आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत रेस्टॉरेंटमधून बाहेर येतान दिसली.

Updated: Oct 17, 2021, 04:46 PM IST
  गरीब महिलेला मदत करणाऱ्या Sara Ali Khan ची का उडवली जातेय खिल्ली?

मुंबई : सारा अली खानबद्दल चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. तिचा जिम लूक असो किंवा एअरपोर्ट लुक, तो व्हायरल होतो. सारा अनेकदा पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद होते. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती एका गरीब महिलेला बिस्किटे वाटताना दिसली.

व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. सारा तिची आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत रेस्टॉरेंटमधून बाहेर येतान दिसली.

वास्तविक संपूर्ण कुटुंब वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. सारा आणि इब्राहिम निघताच पापाराझी त्यांचे फोटो काढू लागतात. थोड्या वेळाने त्यांची आई अमृता या देखील बाहेर आल्या. फोटोग्राफर्स समोर क्लिक केल्यानंतर, तिघे वेगाने कारच्या दिशेने गेले. मग एक महिला त्याच्याकडे पैसे मागत होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

सारा कारमध्ये बसली आणि इब्राहीमने बिस्किटांचे पॅकेट बाहेर काढले त्या गरीब मुलीला दिले. जेव्हा ती महिला तिच्याकडे 10 रुपये मागते तेव्हा सारा तिच्या आईकडून पैसे घेते आणि तिला देते.