मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शनच्या आगामी 'सिम्ब्बा' चित्रपटामध्ये नेमकी कोण अभिनेत्री असणार ? याबाबत सोशल मीडियामध्ये गेले अनेक दिवस चर्चा रंगली होती. मात्र आज अखेर अभिनेत्रीचं नाव घोषित करण्यात आलं आहे.
दिग्दर्शक करण जोहरने आज 'सिम्बा'मधील अभिनेत्रीचं नाव घोषित करण्यात आले आहे मात्र या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींची नावं शर्यतीमध्ये होती.
दीपिका पादुकोण, जान्हवी कपूर, आलिया भट्ट पासून अवघ्या काही दिवसांपासून इंटरनेट सेन्ससेशन ठरलेली प्रिया प्रकाशचं नावदेखील चर्चेमध्ये आलं होतं. मात्र आता या सार्यांवर मात करून सैफ अली खानची मुलगी साराची वर्णी लागली आहे.
Sara Ali Khan in #Simmba with @RanveerOfficial directed by ROHIT SHETTY! Releasing on the 28th of December 2018 ! This winter gets hotter!!!! pic.twitter.com/bjZGjehZl0
— Karan Johar (@karanjohar) March 20, 2018
सिम्बा या हिंदी चित्रपटामध्ये रणवीर सिंह एका पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेत त्याचं नाव संग्राम भालेराव आहे. एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या रिहर्सल सुरू होणार आहे. 28 डिसेंबर 2018 ला हा चित्रपट रीलिज होणार आहे.
सुशांतसिंग राजपूतच्या 'केदारनाथ' या चित्रपटातून सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.