Love Aaj Kal : सारा - कार्तिकचा 'मेहरमा'

प्रेमविरहा भोवती फिरणारं 'मेहरमा' गाणं...  

Updated: Feb 9, 2020, 11:47 AM IST
Love Aaj Kal : सारा - कार्तिकचा  'मेहरमा'  title=

मुंबई : 'ओ मेहरमा क्या मिला यू जूदा होके बता' प्रेमविरहा भोवती फिरणारं 'मेहरमा' गाणं चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान स्टारर 'लव आज कल' चित्रपटाचं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. यु ट्यूबवर हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गाणं प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत १ कोटी ५७ लाख चाहत्यांनी पाहिला आहे. 

'मेहरमा' हे गाणं गायक दर्शन रावल आणि गायिका अंतरा मित्रा यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. तर या गाण्याचं म्यूझिक दिग्दर्शन प्रितमने केलं आहे. या गाण्यामध्ये कार्तिक आणि साराचा रोमॅन्टिक अंदाज चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

सारा अली खान आणि कार्तिक यांचा 'लव आज कल' १४ फेब्रुवारी रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. सारा आणि कार्तिक शिवाय चित्रपटात रणदीप हुड्डा आणि आरूषी शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहेत. 

२००९ मध्ये सैफ आणि दीपिका यांचा 'लव आजकल' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि चित्रपट हीट झाला होता. आता सारा आणि कार्तिकची जोडी पद्यावर काय धमाल करणार ? हे चित्रपट आल्यावर कळेलच. चित्रपटामध्ये त्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे, हे प्रेक्षकांना लवकरचं पाहायला मिळणार आहे.