सीरियल किसर इमरान हाशमीच्या 'या' गाण्याचा नवा विक्रम

कोणतं आहे इमरानचं हे गाणं? जाणून घ्या      

Updated: Apr 21, 2021, 11:44 AM IST
सीरियल किसर इमरान हाशमीच्या 'या' गाण्याचा नवा विक्रम

मुंबई : इमरान हाशमी हा बॉलिवूडमधील ट्रेंड सेटर अभिनेता  म्हणून ओळखला जातो.  पण  आता इमरान एका नव्या कारणासाठी चर्चेत आला आहे. इमरानच्या 'लूट गये' गाण्याने एक नवा विक्रम रचला आहे. 'लुट गये' गाण्याला फक्त 60 दिवसांत तब्बल 500 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 'लूट गये' हे गाणं गायक झुबिन नौटियालच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आलं आहे. गाण्याला मिळालेल्या यशामुळे  झुबिन आणि इमरान अत्यंत आनंदी आहे. 

दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे. झुबिन आनंद व्यक्त करत म्हणाला, 'माझ्या करियरमधला अत्यंत महत्त्वाचं आहे हे गाणं. लूट गये गाण्याने एक नवा विक्रम रचला आहे. लूट गये हे पहिलचं गाणं आहे, ज्याला युट्यूबवर 60 दिवसांत 500 मिलियनपेक्षा लोकांनी पाहिलं आहे... ' असं लिहितं त्याने #LoveYouToDeath ह हॅशटॅग देखील दिलं आहे. 

गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, 'लूट गये' हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. काही दिवसांतचं चाहत्यांनी या गाण्याला अत्यंत डोक्यांवर घेतलं. गाण्यात इमरान पोलिसाच्या भूमिकेत तर Yukti Thareja देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे.