'मी भीक मागते, पण...' परदेशात राहून Priyanka Chopra सतावतेय भारताची चिंता

भारतात कोरोना रूग्णांची संख्या तर दिवसागणिक वाढतचं आहे, पण मृत्यू संख्येने पण तांडव घातला आहे

Updated: Apr 21, 2021, 10:24 AM IST
'मी भीक मागते, पण...' परदेशात राहून Priyanka Chopra सतावतेय भारताची चिंता

मुंबई : भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. भारतात कोरोना रूग्णांची संख्या तर दिवसागणिक वाढतचं आहे, पण मृत्यू संख्येने पण तांडव घातला आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहाता राज्य आणि केंद्र सरकार अनेक उपाय-योजना राबवत आहेत. तरी देखील रूग्ण संख्या वाढतचं आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. भारतात कोरोनाची परिस्थिती पाहाता अभिनेत्री प्रियंका चोप्राने देखील भारताबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

प्रियंका चोप्रा ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. 'भारतात कोविड19ची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. देशातल्या  वेग-वेगळ्या भागातून येत असलेले फोटो मी पाहात आहे. जे फार भयंकर आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. मी भीक मागते, पण घरातचं राहा.' असं म्हणतं  प्रियंकाने सर्वांना घरी राहाण्याचं आवाहन केलं आहे. 

'फक्त तुमच्यासाठी नाही, तर  कुटुंब, अत्यावश्याक सेवेतील  कर्मचारी, मित्रमंडळी, शेजारी सर्वांसाठी प्रत्येकाने घरी थांबावं.' असं देखील प्रियंका पोस्टच्या माध्यमातून म्हणाली आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात नियम कठोर केले आहेत. 

कोरोनाचा कहर पाहाता गेल्या 24 तासांत भारतात  1 हजार 716 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 2 लाख 59 हजार 170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आता पर्यंत भारतात 1 लाख 80 हजार 530 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1, 31,08,8582 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.  देशात 20 लाख 31 हजार 977 रूग्मांवर उपचार सुरू आहेत.