VIDEO : 'मेरा नाम तू' शाहरूख - अनुष्काच्या 'झिरो' सिनेमातील पहिलं गाणं

पाहा हे गाणं 

VIDEO : 'मेरा नाम तू' शाहरूख - अनुष्काच्या 'झिरो' सिनेमातील पहिलं गाणं  title=

मुंबई : शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांचा सिनेमा 'झिरो'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या वर्षात सगळ्यात बिग बजेटच्या यादीत या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातील पहिलं गाणं 'मेरे नाम तू' रिलीज झालं आहे. हे अतिशय रोमँटिक सिनेमा आहे. या गाण्याला लोकप्रिय म्युझिक दिग्दर्शक अजय - अतुल यांनी संगीत दिलं आहे. 

तसेच या गाण्याचे म्युझिकल विजुअल्स देखील अतिशय सुंदर आहेत.  या गाण्यात अतिशय सुंदर असे अनुष्का आणि शाहरूख खान दिसत आहे. या गाण्यात दोघांचा रोमान्स अतिशय सुंदर दिसत आहे. या गाण्यात शाहरूख खान बुटका दाखवला आहे. मात्र या कॅरेक्टरमध्ये देखील रोमांसचा बादशाहने कमाल केलं आहे. बघा हे गाणं 

शाहरूख खान 'बउआ' हे कॅरेक्टर या सिनेमात साकारत आहे. अनुष्का शर्माचं या सिनेमात अतिशय चॅलेंजिग कॅरेक्टर साकारत आहे. तर कतरिना या सिनेमात एका सुपरस्टारचं कॅरेक्टर प्ले करत आहे. हा सिनेमा 21 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.