11 वर्षांपूर्वी दीपिका पदुकोणबद्दल शाहरुख खानने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, न पाहिलेला व्हिडीओ व्हायरल

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या महत्त्वपूर्ण  भूमिका होत्या. 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दीपिकाने शाहरुखसोबतचा सेटवरील एक न पाहिलेला व्हिडीओ शेअर केला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 9, 2024, 05:16 PM IST
11 वर्षांपूर्वी दीपिका पदुकोणबद्दल शाहरुख खानने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, न पाहिलेला व्हिडीओ व्हायरल  title=

Deepika Padukone : दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान हे हिट जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनी पहिल्यांदाच 'ओम शांति ओम' या चित्रपटात काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. हा चित्रपट खूप हिट ठरला. 

रोहित शेट्टी यांचा हा चित्रपट कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्समुळे सुपरहिट ठरला. या चित्रपटातील शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची केमिस्ट्री अप्रतिम होती. 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रसंगी दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर एक न पाहिलेला व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खान तिच्यासाठी भविष्यवाणी करताना दिसत आहे. 

काय केली होती शाहरुखने भविष्यवाणी?

दीपिका पदुकोणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खानने एक भविष्यवाणी केली आहे. हा व्हिडीओ 'चेन्नई एक्सप्रेस' च्या सेटवरील आहे. ज्यामध्ये शाहरुखने म्हटले होते की, दीपिका पदुकोण ही रोहित शेट्टीच्या पोलीस विश्वाचा एक भाग असेल. तिने त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर आत्मविश्वासाने सांगितले होते की ती सिंघम 5 मध्ये असेल आणि आता तसे झाले आहे. दीपिकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुखने सिंघमची सिग्नेचर पोजही दिली आहे. जी सिंघम अगेनच्या पोस्टरमध्ये दीपिकानेही बनवली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोणने शाहरुख खानसोबतचे काही सुंदर क्षण दाखवले आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, तुम्हाला असे वाटते की मला हा डायलॉग किती वेळा रिपीट करावा लागला असता? योग्य उत्तराला बकवास डिक्शनरी मिळेल असं तिने म्हटलं आहे. 

दीपिकाचा सिंघम लूक

रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये दीपिका पदुकोण देखील असणार आहे. सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिम्बा आणि सूर्यवंशी नंतर सिंघम अगेन या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत खळबळ माजवताना दिसणार आहे. दीपिकासह या चित्रपटात रणवीर, अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर हे कलाकारही दिसणार आहेत. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.