Pathaan Movie Controversy: भगव्या बिकिनीचा वाद.... दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्यावर शाहरुख खानची प्रतिक्रिया

दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्या आहेत. पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends) पहायला मिळत आहे. हिंदू संघटनाकडून होत असलेल्या विरोधानंतर शाहरुख खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Dec 16, 2022, 04:11 PM IST
Pathaan Movie Controversy: भगव्या बिकिनीचा वाद.... दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्यावर शाहरुख खानची प्रतिक्रिया  title=

Shahrukh Khan  Pathan Movie: शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाण(Pathan) सिनेमात "बेशरम रंग" नावाच्या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद पेटला आहे. दीपिकाच्या(deepika padukone) ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्या आहेत. पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends) पहायला मिळत आहे. हिंदू संघटनाकडून होत असलेल्या विरोधानंतर शाहरुख खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

बहुचर्चित 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. पठाण चित्रपटाचे पहिले गाणे "बेशरम रंग" सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  या गाण्यात दीपिकाचा ग्लॅलमरस लूक पाहिला मिळतोय.  

बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले

पठाण सिनेमात "बेशरम रंग" नावाच्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकाने मुद्दाम भगव्या रंगाचा ऑऊॉफिट घातल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकनीवरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या कपड्यांचे रंगात परफेक्ट मॅचिंग झाले आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले असल्याची टीका होत आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून 'पठाण' चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे.

शाहरुख खानची प्रतिक्रिया 

कोलकाता येथे 28 व्या  इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला शाहरुखने हजेरी लावली. यावेळी त्याच्या पठाण या चित्रपटाला होत असलेला विरोध आणि बेशरम गाण्याचा वाद यावर प्रतिक्रिया दिली. कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागील दोन वर्षात आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो. आता सगळ पुन्हा पहिल्यासारख नॉर्मल झालं आहे. याचा मला आनंद असल्याचे शाहरुख म्हणाला.

सोशल मिडियावर नकारात्मकता पसरवली जात आहे. आपण मात्र, सकारात्मक राहिले पाहिजे थेट विषयाला हात न घालता आपल्या प्रेरणादायी वक्तव्यातून शाहरुखने ट्रोलर्स आणि टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. आपण सकारात्मक राहिलं पाहिजे असं म्हणत टीकाकारांना आपण जुमानत नसल्याचा आत्मविश्वास त्याने आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला आहे.