मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. ज्यानंतर जवळपास 25 दिवसांच्या कारागृह मुक्कामी गेलेल्या आर्यनचा जामीन अखेर मंजूर करण्यात आला. त्याला जामीन मिळाला असला, तरीही काही अटी मात्र त्यानं मान्य करणं अपेक्षित होतं.
ज्या एनसीबीनं शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेत या सुपरस्टारच्या डोक्याचा ताप वाढवला होता, त्याच एनसीबीमुळं आर्यन खानला ताप भरला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार आर्यनला एसआयटीची नोटीस पाठवण्यात आली होती. 7 नोव्हेंबरला त्याला समन्स बजावण्यात आल होतं. पण, या चौकशीसाठी तो हजर होऊ शकला नाही. ताप येत असल्याचं सांगत आर्यन चौकशी सत्रासाठी हजर राहिला नाही.
जामीन मिळाल्यानंतर आर्यन 5 नोव्हेंबरला पहिल्यांदाच एनसीबी कार्यालयात पोहोचला होता. निखील मानेशिंदे या वकिलांसह तो तिथे पोहोचला होता.
आर्यन खानला एनसीबीनं एका क्रुज पार्टीमधून ताब्यात घेतलं होतं. 3 ऑक्टोबरला त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.Narcotic Drugs and Psychotropic Substances (NDPS) Act अंतर्गत येणाऱ्या कलम Section 8(c), 20(b), 27, 28, 29, आणि 35 अन्वये त्याच्यावर आरोपल लावण्यात आले होते.