सलमान नाही तर हा सुपरस्टार 'धूम ४' सिनेमात करणार अॅक्शन

'धूम' सीरिजचे सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. आता 'धूम ४' सिनेमासंदर्भात एक बातमी समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 16, 2017, 04:31 PM IST
सलमान नाही तर हा सुपरस्टार 'धूम ४' सिनेमात करणार अॅक्शन  title=
Pic Courtesy: TV show still

मुंबई : 'धूम' सीरिजचे सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. आता 'धूम ४' सिनेमासंदर्भात एक बातमी समोर येत आहे.

धूम सीरिजच्या सर्वच सिनेमांत जबरदस्त अॅक्शन दाखविण्यात आली आहे. अभिनेता जॉन अब्राहम, ह्रतिक रोशन आणि आमीर खान यांची उत्तम अभिनय केल्याचं पहायला मिळालं. आता गेल्या काही दिवसांपासून 'धूम ४' सिनेमाची चर्चो वेगाने होत आहे.

आधी सांगण्यात येत होतं की, 'धूम ४'  सिनेमात अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत असणार आहे. मात्र, आता या सिनेमासोबत एक नवं नाव जोडण्यात येत आहे. होय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'धूम ४' या आगामी सिनेमात अभिनेता शाहरूख खान हा प्रमुख भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

यशराज फिल्म्सच्या 'धूम ४' या सिनेमाला चांगल्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न आहे. यासाठी यशराज फिल्म्सने मनीष शर्मा यांना सिनेमाचं स्क्रिप्ट लिहिण्यास सांगितलं आहे.