मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या पूर्ण वेळ पत्नी मीरा राजपूतला देत आहे. कारण मीरा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. पण आता एका खास कारणामुळे बॉलिवूडचे हे क्युट कपल चर्चेत आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत सध्या एका जाहिरातीसाठी शूट करत आहेत. बेबी प्रॉडक्टच्या एका जाहीरातीसाठी दोघे एकत्र झळकणार असल्याची चर्चा आहे. असे झाले तर चाहत्यांना खास सरप्राईज मिळेल. बॉलिवूडशी काहीही संबंध नसलेल्या मीराने येथील वातावरणाशी छान जुळवून घेतले. टीव्ही शोज, मुलाखती, इव्हेंट्सला ती पूर्ण आत्मविश्वासाने सामोरी जाते. त्यामुळे मीराही बॉलिवूडमध्ये एंट्री करणार का? असा प्रश्न चाहत्यांमध्ये होता. पण या जाहिरातीच्या माध्यमातून चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल, असे दिसते.
अलिकडेच शाहिदने मुबंईत नवीन घर खरेदी केले आहे. या अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
त्याची २३ वर्षीय पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असून या दोघांना २ वर्षांची मुलगी आहे. मीरा आणि शाहिद २०१५ मध्ये विवाहबद्ध झाले आणि वर्षभरातच मुलगी मीशाचा जन्म झाला.
शाहिद कपूर सध्या बत्ती गुल मीटर चालू या सिनेमाचे शूटिंग करत आहे. त्यानंतर तो साऊथचा सुपरहिट सिनेमा अर्जुन रेड्डीच्या हिंदी रिमेकचे शूटिंग सुरु करेल. बाळाच्या जन्मानंतर शाहिद महिनाभर सुट्टी घेणार आहे. म्हणून सप्टेंबरपर्यंत सिनेमांचे जास्तीत जास्त शूटिंग पूर्ण करण्यावर त्याचा भर आहे.