शाहिद कपूर गंभीर जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

 सुपरक्यूट ते सुपरअँग्री हिरो असा प्रवास केलेला शाहिद कपूर 'कबीर सिंग'नंतर आता 'जर्सी'मुळे चर्चेत आहे. 

Updated: Dec 19, 2021, 02:51 PM IST
 शाहिद कपूर गंभीर जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरक्यूट ते सुपरअँग्री हिरो असा प्रवास केलेला शाहिद कपूर 'कबीर सिंग'नंतर आता 'जर्सी'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला असून लोकं या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहिद कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्याच्या तोंडातून रक्त येताना दिसत आहे. हा व्हिडिओ शाहिदने स्वतः शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने त्याच्या दुखापतीबाबत खुलासाही केला आहे.

शूटिंग दरम्यान  झाला अपघात
खरंतर हा व्हिडिओ आताचा नसून 'जर्सी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा बीटीएस व्हिडिओ आहे. ज्यामध्ये शाहिदच्या ओठांना दुखापत झाल्याचं दिसत आहे.   शाहिदने या चित्रपटासाठी किती मेहनत घेतली आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर फलंदाजी करताना त्याच्या ओठावर खोल दुखापत झाली. त्याला 25 टाकेही पडले, पण त्याने हार मानली नाही आणि तो मैदानातच राहिला.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहिदने सांगितला किस्सा
शाहिद कपूरने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने हातात बॅट धरलेली दिसत आहे. त्याचबरोबर जेव्हा शाहिद स्टेडियममध्ये एंट्री घेतो.  तेव्हा लोकं त्याला चियर करताना दिसत आहेत. हा शॉट व्हिडिओ बहुधा चित्रपटाची क्लिप आहे. पण त्यापुढील सीन अगदी रिअल आहेत. एक बॉल शाहिद कपूरच्या ओठावर लागला. त्यामूळे त्याच्या ओठांना जखम झाली. आणि  रक्त वाहू लागलं. त्याच्या हातालाही दुखापत झाली. शाहिदला 25 टाके पडले. पण त्याने हार मानली नाही.