मुंबई : अभिनेता शाहीद कपूर स्टारर 'कबीर सिंग' चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरला. 'कबीर सिंग' चित्रपटानंतर शाहीद कोणत्याचं चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला नाही. तर शाहीद लवकरचं 'जर्सी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहीद कितीही व्यस्त असला तरी तो त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबाला वेळ देतो. शाहीदची पत्नी मिरा राजपूत कपूर एक अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिची चर्चा कायम रंगलेली असते.
एका मुलाखती दरम्यान मिराला 'जर तुझं आणि शाहीदच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, तर त्याला कोणती करणं असू शकतात? ' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मिरा म्हणाली, 'माझ्या सासरचे कधीही आमच्यामध्ये बोलत नाहीत. आमची सेक्स लाईफ देखील चांगली सुरू आहे. यानंतर जर कधी शाहीदने मला फसवलं तरचं आमचं नात तुटू शकतं.'
पुढे मिरा म्हणली, 'जेव्हा शाहीदच्या घरून मला लग्नासाठी मागणी घालण्यात आली, तेव्हा मला वाटलं शाहीदचा छोटा भाऊ रूहानसाठी स्थळं असेल.' हा खुलासा देखील मिराने मुलाखती दरम्यान केला. सांगायचं झालं तर मिरा आणि शाहीदमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. शाहीद आणि मिराला 2 मुलं आहेत.
शाहीदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कबीर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेता शाहीद कपूर आता 'जर्सी' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटच्या कथे भोवती फिरणारा हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.