शाहरुख खानची 'ही' अभिनेत्री गंभीर आजाराने त्रस्त; जाणून बसेल धक्का

 प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याचा खळबळजनक खुलासा करून या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. रईस या चित्रपटात शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली होती.

Updated: Aug 30, 2023, 02:24 PM IST
शाहरुख खानची 'ही' अभिनेत्री गंभीर आजाराने त्रस्त; जाणून बसेल धक्का title=

मुंबई : प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याचा खळबळजनक खुलासा करून या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. रईस या चित्रपटात शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केलेली अभिनेत्री माहिरा खान बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त आहे. ती जवळ जवळ  6-7 वर्षांपासून याच्यावर उपचार घेत आहे. या आजाराची सुरुवात शाहरुख खानचा चित्रपट 'रईस' रिलीज झाल्यानंतर तिला मिळालेल्या भयानक ट्रोलने झाली. याचा थेट परिणाम अभिनेत्रीच्या तब्येतीवर झाला आणि तो इतका गंभीर होता की माहिराला हा आजार झाला असं तिचं म्हणणं आहे.

2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली तेव्हा माहिरा खानचा आजार समोर आला. अभिनेत्रीला डिप्रेशन और एंग्जायटी  यांवर औषधोपचार करून सुमारे 6 ते 7 वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप ती या आजारातून पूर्णपणे बरी झालेली नाही. लोकांच्या प्रतिक्रिया आणि सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे माहिराच्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम झाला होता.

बायपोलर डिसऑर्डर: हा मानसिक आजार आहे का?
बायपोलर डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे ज्यामुळे डिप्रेशन आणि मूड स्विंग होतात. 25 वर्षांच्या आसपास एखाद्या व्यक्तीला याचं निदान होतं, मात्र किशोरावस्थामध्ये देखील लक्षणे दिसू शकतात. या विकारात रुग्णाची मनस्थिती सतत बदलत राहते आणि कधी कधी आत्महत्येचेही विचारही येतात. तसंच रुग्णाच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं कठीण होतं.

बायपोलर डिसऑर्डरची कारणं आणि लक्षणं
बायपोलर डिसऑर्डर असलेल्या लोकांना झोपेचा त्रास होतो
चिडचिडेपणा होतो
वेडेपणा आणि डिप्रेशन एकसाथ होतं
एनर्जीची कमी आणि काम पूर्ण करण्यात अडचण
अनेकदा हरवून जातो
विचारात मग्न राहणं
खूप फास्ट-फास्ट बोलणं
स्वत:ला दुखापत पोहचवणं आणि आत्महत्येचे विचार

बाइपोलर डिसऑर्डरवर प्रतिबंध
लाईफस्टाईलमध्ये सकारात्मक बदल प्रतिबंधासाठी मदत करतात.
नियमित व्यायाम करणे.
खाण्याचं आणि झोपण्याचं शेड्यूल  बनवा आणि त्याचे अनुसरण करा.
तुमच्या मनःस्थितीतील चढ-उतार समजून घेण्याचा प्रयत्न करा.
तणावावर नियंत्रण ठेवायला शिका.
दारू पिऊ नका.
लक्षणे गंभीर असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.