Shalmali Kholgade tie knot : शाल्मली खोलगडे अडकली विवाह बंधनात

शाल्मली खोलगडे गुपचूप अडकली विवाह बंधनात  

Updated: Nov 30, 2021, 09:40 AM IST
Shalmali Kholgade tie knot : शाल्मली खोलगडे अडकली विवाह बंधनात

मुंबई :  सर्वत्र सेलिब्रिटींच्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना गायिका शाल्मली खोलगडे विवाह बंधनात अडकली आहे. शाल्मलीने 22 नोव्हेंबर रोजी आयुष्याची नवी सुरूवात केली. शाल्मलीच्या पतीचं नाव फरहान शेख असं आहे. फरहान मुंबईत मिक्सिंग आणि मास्टरींग इंजिनिअर म्हणून काम करतो. शाल्मली आणि फरहान यांनी अत्यंत गुपित पद्धतिने लग्न केलं. 
 
गुपचूप लग्न केल्यानंतर शाल्मली आणि फरहानने त्यांच्या मित्रमंडळींसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे. 1 डिसेंबर रोजी दोघे मित्रांना रिसेप्शन पार्टी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शाल्मली आणि फरहानच्या नात्याहबद्दल सांगायचं झालं तर दोघे सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 

सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 22 नोव्हेंबर रोजी नात्याला नवं नाव दिलं आहे. नवविवाहित जोडप्याच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'शाल्मली आणि खरहानला कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करत थोडक्यात लग्न करायचं होतं. हे कपल कोर्ट मॅरिज करणार हेतं पण कुटुंबाच्या उपस्थिती शल्मली आणि फरहान विवाह बंधनात अडकले...'

शल्मली आणि फरहानच्या विवाह सोहळ्यात अवघ्या 15 जणांची उपस्थिती होती. शाल्मलीबद्दल सांगायचं झालं तर ती प्रसिद्ध गायिका आहे. तिने परशान (इशकजादे), दारू देसी (कॉकटेल) आणि बालम पिचकारी (ये जवानी है दिवानी) सारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. तिने म्युझिक रिअॅलिटी शो, 'इंडियन आयडॉल ज्युनियर' आणि 'सूर नवा ध्यास नवा'मध्ये परीक्षकाची जबाबदारी पार पाडली.