विकी आणि कतरिनाच्या लग्नावर Omicronचं सावट

Omicronचं संकट... विकी-कतरिना अडकणार विवाह बंधननात?  

Updated: Nov 30, 2021, 09:00 AM IST
विकी आणि कतरिनाच्या लग्नावर Omicronचं सावट

मुंबई : सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहात आहेत. अनेक सेलिब्रिटी नवं आयुष्य सुरू करण्याच्या विचारात आहेत. अशात Omicron व्हेरिएन्टचं सावट पाहायला मिळत. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नावर देखील ओमायक्रॉनचं सावट घोंगावताना दिसत आहे. 9 डिसेंबर रोजी विकी आणि कतरिना लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  लग्नाबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

लग्नात येणाऱ्या पाहुण्याची यादी तयार झाली असताना Omicron व्हेरिएन्टमुळे काही पाहुण्यांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी यांच्या लग्नात अडथळे येवू नये म्हणून सर्व खबरदारी घेत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या दोन्ही सेलिब्रिटींच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, लग्नाच्या नियोजकांनी पाहुण्यांची संख्या कमी करण्याची योजना आखली आहे. विकी आणि कतरिनाने लग्नाच्या नियोजकांसोबत बैठक घेत ओमायक्रॉम व्हेरिएन्टच्या वाढत्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली.

कतरिना कैफच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, लव्हबर्ड्स हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करतील. 7 व 8 डिसेंबर रोजी संगीत व मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. दोघांच्या चाहते त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. पण विकी आणि कतरिना खरंच लग्न करणार आहेत की नाही हे येणारा काळचं ठरवेल.