शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच येणार एकत्र

Sharad Ponkshe, Bharat Jadhav and Sunil Barve : शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच याची जोडी 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

दिक्षा पाटील | Updated: Oct 14, 2024, 04:56 PM IST
शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच येणार एकत्र
(Photo Credit : Social Media)

Sharad Ponkshe, Bharat Jadhav and Sunil Barve : मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करत असलेल्या 'बंजारा' या चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच सोहळा पार पडला. या निमित्तानं यावेळी सोहळ्यात सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीनं लक्ष वेधलं असेल तर ते आहे अभिनेता शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे आणि स्नेह पोंक्षे यांची बाईकवरील ग्रॅंड एन्ट्री होती. या कार्यक्रमाची चारचांद जर कोणी वाढवली असेल तर ती आहे प्रमुख पाहुणे म्हणजे महेश मांजरेकर होते. 

Add Zee News as a Preferred Source

स्नेह पोंक्षेनं या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासोबत प्रेक्षकांनाच्या मैत्रीचा प्रवास सगळा अनुभवता येणार आहे. यावेळी चित्रपटाच्या 20 फूट उंचीच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये तीन वयस्क मित्र सिक्कीमच्या पर्वतरांगांमध्ये बाईकराईडचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी किती आनंददायी आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत आहे. अनेकदा कुठे जायचंय, यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा अनुभव सुखकारी असावा, ही गोष्ट प्रवासात नेहमीच महत्वाची असते आणि आपण याच आनंदाला बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा 'बंजारा' आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शरद पोंक्षे निर्मितीत आणि स्नेह पोंक्षे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. 

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणाला, 'माझ्या पहिल्या चित्रपटात वडिलांसोबत, भरत जाधव, सुनिल बर्वे अश्या दिग्गच कलाकारनसोबत काम करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा मला या चित्रपटासाठी निश्चितच फायदा झाला आहे. ‘बंजारा’ चित्रपटाच्या संकल्पनेतून मला एक गोष्ट सांगायची होती - असं म्हणतात की कुठे जायचंय त्यापेक्षा तिथे जाण्या चा प्रवास आनंददाई असायला हवा पण आपण तो आनंद कधी लुटतच नाही बंजऱ्या सारखं जमलं पाहिजे आनंदाने प्रवास करता आला पाहिजे. मला ही खात्री आहे की सगळ्यांना चित्रपटातील प्रवास नक्कीच आवडेल.

हेही वाचा : 'सासूसोबत ठेवायचे होते शारिरीक संबंध'; रॅपरच्या असिस्‍टेंटचे धक्कादायक खुलासे, म्हणाली, 'मला ड्रग्स दिले अन्...'

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, 'हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनाची कथा सांगणारा आहे. स्नेहने हा विषय खूपच सुंदर हाताळला आहे. तीन मित्रांच्या प्रवासाची ही कथा प्रेक्षकांचे मतपरिवर्तन करणारी आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना साधारण कथेचा अंदाज आला असेलच. मला खात्री आहे, चित्रपटही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'

About the Author