...म्हणून शाहरुख अंर्तवस्त्र ऑनलाईन खरेदी करत नाही

शाहरुखकडून 'या' गोष्टीचा खुलासा...

Updated: Jan 18, 2020, 12:59 PM IST
...म्हणून शाहरुख अंर्तवस्त्र ऑनलाईन खरेदी करत नाही title=

मुंबई : बॉलिवूड किंग खान शाहरुखने (Shahrukh Khan) त्याच्या एका खासगी गोष्टीबाबतचा खुलासा केला आहे. अंर्तवस्त्र ऑनलाईन खरेदी करताना तो कंफर्टेबल फिल करत नसल्याचं शाहरुखने सांगितलं. शाहरुखने तो सर्व पुस्तकं अमेझॉनवर खरेदी करतो, किराणा सामानाची खरेदी बिग बास्केटमधून करत असल्याचं सांगितलं. पण त्याने 'मी अंर्तवस्त्राची ऑनलाईन खरेदी करताना कंफर्टेबल नसल्याचा' खुलासा केला आहे.

अमेझॉन ग्लोबलचे सीईओ जेफ बेजोस सध्या भारतात आले आहेत. त्यांनी गुरुवारी शाहरुख खानची भेट घेतली. या भेटीदरम्यान यांच्याशी बोलताना शाहरुखने काही गोष्टीचा खुलासा केला. यादरम्यान बोलताना शाहरुखने, झोपणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे, त्यामुळेच अधिक झोपण्याला त्याची पसंती नसल्याचंही तो म्हणाला.

शाहरुखने २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिरो' चित्रपटानंतर, कोणत्याही चित्रपटाची घोषणा केलेली नाही. अनेक दिवसांपासून तो कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतोय. २०१९ मध्ये शाहरुखचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पण यादरम्यान त्याने सुजॉय घोष यांच्या 'बदला' चित्रपटाची आणि इम्रान हाशमीच्या 'बार्ड ऑफ ब्लड' वेब सीरीजची निर्मिती केली. सोशल मीडियावर अनेकदा  #WeWantAnnouncementSRK हा हॅशटॅगही ट्रेंड झाला आहे. 

सध्या, शाहरुख आणि सलमान संजय लीला भंन्साली यांच्या चित्रपटात एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता खरोखरचं सलमान-शाहरुख ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.