अरबाजच्या गर्लफ्रेंडचा 'या' व्यक्तीसोबत बाथटबमध्ये डान्स; व्हीडिओ व्हायरल

सध्या जॉर्जिया त्या व्हीडिओमुळे तुफान चर्चेत आली आहे.

Updated: Apr 27, 2021, 02:07 PM IST
अरबाजच्या गर्लफ्रेंडचा 'या' व्यक्तीसोबत बाथटबमध्ये डान्स; व्हीडिओ व्हायरल title=

मुंबई : अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता  अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.  तर अरबाज आता जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. आता सध्या जॉर्जिया तुफान चर्चेत आली आहे. जॉर्जियाबद्दल रंगलेल्या चर्चेला कारण देखील तसचं आहे. जॉर्जिया  बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशासोबत बाथटबमध्ये डन्स करताना दिसत आहे. तर जॉर्जिया  आणि  शहबाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहबाज आणि अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एका प्रोजेक्टमध्ये  एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोघेही एका म्यूझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार आहे. जॉर्जियाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती  शहबाजसोबत थिरकताना दिसत आहे.जॉर्जिया-शहबाज 'टेम्परेचर' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)

जॉर्जियाने व्हीडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'अशा गोष्टी मी माझ्या पार्टनर इन क्राईमसोबत करत असते.' सध्या या व्हिडिओमुळे जॉर्जिया आणि शहबाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. जॉर्जियाच्यया पोस्टवर शहबाजने कमेंट देखील केली आहे. 'वाह' असं  म्हणतं त्याने लाल रंगाचा इमोजी पाठवला आहे. 

जॉर्जियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने दाक्षिणात्या 'कॅरोलाइन' आणि 'कमाक्षी' चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या शिवाय ती मीका सिंहसोबत एका म्युझिक व्हीडिओमध्ये देखील दिसली होती. त्यानंतर तिने 'रूप तेरा मस्ताना' हे  आयकॉनिक गाणं रीक्रिएट केलं. आता ती अभिनेता श्रेयससोबत  'वेलकम टू बजरंगपूर'मध्ये दिसणार आहे.