मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिची चर्चा कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमुळे नाही तर आजारपणामुळे आहे. शिल्पा शेट्टीची आई सुनंदा यांची नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली आहे. याबाबतच शिल्पाने तिच्या आईसाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाने तिची आई सुनंदा यांचा डॉक्टरांसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेनची हार्ट सर्जरी केली होती''.
शिल्पा शेट्टीने तिच्या चाहत्यांना तिच्या आईच्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे. तिच्या या पोस्टवप शमिता शेट्टीने कमेंट करत लिहिलं, "आमची आई सर्वात मजबूत आहे.. लव्ह यू."
तिच्या आईचा डॉक्टरांसोबतचा एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "कोणत्याही मुलासाठी आई-वडिलांची शस्त्रक्रिया करताना पाहणं कधीच सोपं नसतं. पण, मला माझ्या आईकडून काही शिकायचं असेल तर ते आहे. तिचं धैर्य आणि तिचा लढण्याची भावना''
गेले काही दिवस चढ-उतारांचे होते. पण, माझी हिरो आणि माझ्या हिरोच्या हिरोने सगळं सगळं काही ठिक केलं! शस्त्रक्रियेआधी, दरम्यान आणि नंतर माझ्या आईची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल डॉ राजीव भागवत यांचे खूप खूप आभार. नानावटी हॉस्पिटल आणि त्यांच्या नियमित सहकार्याचे आभार. माझ्या आईच्या आरोग्याठी मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे."
सुष्मिता सेनवरही शस्त्रक्रिया झाली
डॉ. राजीव भागवत तेच हार्ट स्पेशालिस्ट आहेत ज्यांनी सुष्मिता सेनवरही नुकतेच उपचार केले. सुष्मिता सेनची अँजिओप्लास्टी प्रक्रिया झाली, त्यानंतर ती हळूहळू बरी होत होती आणि आता ती तिच्या फिटनेस रुटीनमध्ये परतली आहे.
शिल्पाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झालं तर सोनल जोशी दिग्दर्शित 'सुखी' या चित्रपटात शिल्पा शेट्टी लवकरच दिसणार आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्येही दिसली आहे. या सिरीजमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय देखील आहेत. शिल्पाचा शेवटचा रिलीज 'हंगामा 2' होता. यामध्ये तिच्यासोबत परेश रावल, मीजन आणि प्रणिता सुभाष होते.