close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून शिल्पाचं कौतुक

 शिल्पा शेट्टी कायम तिच्या फिटनेस व्हिडिओमुळे चर्चेत असते.

Updated: Aug 20, 2019, 02:32 PM IST
...म्हणून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून शिल्पाचं कौतुक

मुंबई : आपल्या लटक्या-झटक्यांनी सर्वांचं मन जिंकणारी शिल्पा शेट्टी कायम तिच्या फिटनेस व्हिडिओमुळे चर्चेत असते. नुकताच शिल्पाने स्लिम पिल्स अर्थात बारीक होण्यासाठीच्या गोळ्यांची जाहिरात नाकारली आहे. खरं तर अशा जाहिरातींमधून लाखो करोडो रुपये मिळतात, पण ते नाकारुन शिल्पाने एक चांगला संदेश समाजामध्ये दिला. शिल्पाच्या या निर्णयाबद्दल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तिचे कौतुक केले आहे.   

ट्विटरच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शिल्पाचे कौतुक केले आहे. ज्या उत्पादनांवर आपला विश्वास नाही अशा उत्पादनांची जाहिरात सेलिब्रिटींनी नाकारली तर समाजहित साधले जाईल. 

याआधीही साई पल्लवी, कंगणा रनौत या अभिनेत्रींनी कोटी रुपयांच्या फेअरनेस क्रिमच्या जाहिराती नाकारल्या होत्या. आता शिल्पानेही बारीक होण्याच्या गोळ्यांची जाहिरात नाकारुन चांगला निर्णय घेतला आहे. 

शिल्पा लवकरच शब्बीर खान यांच्या दिग्दर्शनाशाली साकारण्यात येणाऱ्या 'निकम्मा' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पून:पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये शिल्पासोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी झळकणार आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात शिर्ले शेटिया सुद्धा भूमिका साकारणार आहे.