Shilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? Kissing प्रकरणी कोर्टानं विचारला सवाल

Shilpa Shetty कोणत्या कारणामुळे पुन्हा एकदा अडकली वादाच्या भोवऱ्यात... जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

Updated: Jan 7, 2023, 06:43 PM IST
Shilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? Kissing प्रकरणी कोर्टानं विचारला सवाल title=

Shilpa Shetty Richard Gere Kiss in Event rajasthan : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) लाखो चाहते आहेत. शिल्पा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. वयाच्या 45 व्या वर्षी देखील असलेल्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. दरम्यान, आता शिल्पा तिच्या एका जुन्या वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2007 मध्ये एका कार्यक्रमात शिल्पाला हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेनं (Richard Gere) सगळ्यांसमोर तिला किस केले होते. त्यानंतर यावरून खूप मोठा वाद सुरु झाला होता. 

शिल्पाचा हा जुना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकरणी शिल्पाविरोधात तीन एफआयआरही दाखल झाल्या आहेत. शिल्पानं 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून यापैकी एक एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. आता या याचिकेवर न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. शिल्पानं दाखल केलेल्या याचिकेत तिने सरकारला 2007 साली झालेल्या किसच्या घटनेचा एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र, शिल्पाच्या याचिकेवर समोरून काहीही उत्तर आले नाही. इतकंच काय तर एफआयआर देखील रद्द करण्यात आल्या नाही. 

नेमकं प्रकरण काय?

शिल्पा शेट्टीने २००७ साली राजस्थानमध्ये एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात तिला हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने किस केले होते. 2007  मध्ये घडलेल्या या घटनेनंतर तिच्याविरुद्ध अश्लीलतेच्या आरोपाखाली राजस्थानमध्ये दोन आणि गाझियाबादमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिल्पा शेट्टीच्या या प्रकरणावर बराच वाद झाला होता. याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. या खटला मुंबईला हस्तांतरित करण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये परवानगी दिली होती. तर दुसरीकडे, शिल्पाचे  अधिवक्ता मधुकर दळवी यांच्यामार्फत CPC च्या कलम 239 आणि 245 अंतर्गत डिस्चार्जसाठी अर्ज केला होता. दरम्यान या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायलयाने हा खटला रद्द केला होता. दोन तक्रारींपैकी एका तक्रारीत शिल्पाला दिलासा मिळाला, पण दुसऱ्या तक्रारीत कोर्टानं हे खटल्याचं प्रकरण असल्याचं सांगत नकार दिला. अशा परिस्थितीत हा एफआयआर रद्द करण्यासाठी शिल्पाने उच्च न्यायालयात दाद मागितली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आता महाराष्ट्र सरकार आणि प्रतिवादी यांच्याकडून उत्तरे मागवली आहेत. शिल्पाच्या वकिलाने सांगितले की, सरकार आणि प्रतिवादीला चार आठवड्यात उत्तर द्यावे लागेल.