शिल्पा शेट्टी ने ‘इंडियन आयडल’ च्या सेटवर उघडले जुने रहस्य. शाहरुख खानवर केले हे वक्तव्य....

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा गायन रिअ‍ॅलिटी शो 'इंडियन आयडल' पहिल्या सत्रापासूनच प्रेक्षकांची मन जिंकत आहे. आता या शोची क्रेझ लोकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. या शनिवार आणि रविवारी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होईल, कारण सुपर डान्सर चॅप्टर 4 चे जज असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी, दिग्दर्शक अनुराग बासू आणि डान्सर गीता कपूर स्टेजवर हजर असतील.

Updated: Mar 19, 2021, 05:16 PM IST
शिल्पा शेट्टी ने ‘इंडियन आयडल’ च्या सेटवर उघडले जुने रहस्य. शाहरुख खानवर केले हे वक्तव्य.... title=

मुंबई : सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा गायन रिअ‍ॅलिटी शो 'इंडियन आयडल' पहिल्या सत्रापासूनच प्रेक्षकांची मन जिंकत आहे. आता या शोची क्रेझ लोकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. या शनिवार आणि रविवारी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होईल, कारण सुपर डान्सर चॅप्टर 4 चे जज असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी, दिग्दर्शक अनुराग बासू आणि डान्सर गीता कपूर स्टेजवर हजर असतील.

यावेळी, शो कंन्टेस्टंट असलेले निहाल आणि सायली यांनी 'ऎ मेरे हमसफर', 'किताबें बहुत-सी' आणि 'चुरके दिल मेरा' या सारख्या गाण्यांवर आपलं गाण सादर केलं. ते त्यांनी इतक सुंदर गायलं की सर्व जज आणि विशेष पाहुण्यांनीही त्यांची खूप वाहवाही केली. इतकेच नाही तर निहाल आणि सायली यांनी शिल्पा शेट्टी बरोबर 'चुरके दिल मेरा' या गाण्यावर डान्स देखील केला.

त्यावेळी शिल्पाला तिच्या जुन्या किस्स्यांची आठवण आली. शाहरुख खानने 'बाजीगर' या तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिची कशी मदत केली? हे तिने सांगितले.

शिल्पा शेट्टी म्हणाली, 'बाजीगर' हा माझा पहिला चित्रपट होता आणि त्यावेळी मी खूप घाबरले होते. पण शाहरुख खूप गोड आहे. तो मला नेहमी शांत करीत असे आणि माझ्या सीनमध्ये मला मदत करत असे. आम्ही 'ऐर मेरे हमसफर' गाण्याचे शूट करीत होतो.

या गाण्याचे बोल मला लिप सिंक करावे लागले, पण मला ते व्यवस्थित करता येत नव्हते. त्यावेळी शाहरुख खानने सज्जन माणसासारखे या गाण्यात मला लिप सिंक करण्याची टेकनीक शिकवली आणि मला मदत केली."