पश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णय

नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेचे खूप महत्त्वाचे अपडेट्स. पश्चिम रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय, तसेच मेगा भरतीबाबत महत्त्वाची माहिती. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 1, 2024, 08:30 AM IST
पश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णय  title=

पश्चिम रेल्वेचे तीन महत्त्वाचे अपडेट्स आपण या बातमीत पाहणार आहेत. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  मुंबई सेंट्रल ते भिवानी दरम्यान विशेष भाड्यावर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. मुंबई-उधनादरम्यान विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तर या ट्रेनचे वेळापत्रक कसं असेल, कोणत्या विशेष लोकल कोणत्या वेळेत सोडल्या जाणार आहेत. 

असं आहे रेल्वेच वेळापत्रक?

ट्रेनक्रमांक 09001 भिवानी सुपरफास्ट स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता निघेल. ही ट्रेन 3 ते 17 डिसेंबरदरम्यान धावणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक 09002 ही गाडी भिवानी येथून दर बुधवार आणि शनिवारी दुपारी 2.45 वाजता सुटणार आहे. ही ट्रेन 4 ते 18 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. वांद्रे-उधना स्पेशलचा विस्तार ट्रेन क्रमांक 09055 वांद्रे टर्मिनस-उधना स्पेशल यापूर्वी 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०५६ उधना-वांद्रे टर्मिनस स्पेशल या परतीच्या गाडीची मुदतही ३१ डिसेंबर वाढवण्यात आली असल्याने
प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय 

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवर 2 ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशविदेशातील लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेची मेगा भरती परीक्षा

भारतीय रेल्वेने रेल्वेची मेगा भरती सुरु केली आहे. परीक्षा विविध झोन, विभाग आणि कार्यशाळा यामधील गैर- तांत्रिक लोकप्रिय श्रेणी आणि तांत्रिक श्रेणी या दोन्हींमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी 23 रेल्वे भरती बोर्डमार्फत अधिसूचना जारी केली होती. भरती मोहिमेत सहायक लोको पायलट, स्टेशन मास्टर, ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ, कमर्शियल क्लर्क, ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समन आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनमधील विभागीय सहायक पदांचा समावेश होता.