'Super Dancer 4' च्या सेटवर पोहोचताचं रडू लागली शिल्पा शेट्टी

पतीच्या अटकेनंतर शिल्पाने पुन्हा काम करायला सुरूवात केली; पण...

Updated: Aug 20, 2021, 12:47 PM IST
'Super Dancer 4' च्या सेटवर पोहोचताचं रडू लागली शिल्पा शेट्टी

मुंबई : आश्लील चित्रपटांची शुटिंग आणि ते इंटरनेटवर पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पण या सर्व गोष्टीला बाजूला ठेवत शिल्पाने कामाला नव्याने सुरूवात केली आहे. पतीचं नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर शिल्पा 'सुपर डान्सर 4' शोपासून दूर होती. आता प्रकरण नियंत्रणात असताना तिने शुटिंगला पुन्हा नव्याने सुरूवात केली आहे. शिल्पाने  'सुपर डान्सर 4' शोच्या पुढच्या एपिसोडची शुटिंग पूर्ण केली आहे. 

'सुपर डान्सर 4' शोचा नवा एपिसोड लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जेव्हा शिल्पा सेटवर पोहोचली तेव्हा तिला रडू आवरलं नाही. त्यामुळे सेटवर भावूक वातावरण झालं. सेटवर पोहोचताचं सर्वांनी तिला घेरलं. स्पर्धक तिला फार मिस करत होते. सेटवर शिल्पाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तेव्हा शिल्पाला रडताना पाहून तिला सर्वांनी मिठी मारली. 

राज कुंद्रा प्रकरणानंतर ती पहिल्यांदा टीव्हीवर दिसणार आहे. दरम्यान,  उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला सोमवारी रात्री (19 जुलै 2021) अश्लील चित्रपट निर्मिती आणि त्याचे काही ऍप्सवरून प्रकाशित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांना त्याच्या विरोधात पुरावे देखील सापडले आहेत. 

राज कुंद्रा 10 कंपन्यांमध्ये मालक आहेत. राज कुंद्राला 2004 मध्ये एका ब्रिटिश मॅगजीनने सगळ्यात श्रीमंत आशियातील ब्रिटिश लिस्टमध्ये 198 वं स्थान दिलं. आयपीएलमध्ये देखील ते राजस्थान रॉयलचे मालक होते.