'साहो' चित्रपटातील श्रद्धा कपूरचा पहिला लूक व्हायरल

२०१७ साली बाहुबली या चित्रपटाने जगभरातील रसिकांची मनं जिंकली.

Updated: Mar 5, 2018, 04:06 PM IST
'साहो' चित्रपटातील श्रद्धा कपूरचा पहिला लूक व्हायरल   title=

मुंबई : २०१७ साली बाहुबली या चित्रपटाने जगभरातील रसिकांची मनं जिंकली.

दोन चित्रपटांच्या भागामध्ये बनलेल्या 'बाहुबली'मुळे प्रभास हा अभिनेता जगभरात पोहचला. जगभरातील तरूणींमध्ये 'प्रभास' बाबत क्रेझ निर्माण झाली आहे. 

प्रभास आता श्रद्धा कपूरसोबत  

अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर ही जोडी 'साहो' या आगामी चित्रपटातून लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील श्रद्धा कपूरचा पहिला लूक लवकरच रसिकांच्या भेटीला आला आहे.  

श्रद्धा कपूर खास भूमिकेत  

श्रद्धा कपूर लवकरच 'साहो' चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील तिचा हटके अंदाज रसिकांमध्ये उत्सुकतेचा विषय बनला आहे.  
श्रद्धा कपूरची मेकअप आर्टिस्ट श्रद्धा नाईकने चित्रपटातील तिचा खास लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  

 

 

दिवाळीच्या मुहुर्तावर येणार चित्रपट  

'साहो' या चित्रपटामध्ये प्रभास सोबत श्रद्धा कपूर झळकणार आहे. सोबतच नील नितिन मुकेशही रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे संगीत शंकर -एहसान- लॉय यांचे आहे. तर हा चित्रपट यंदा दिवाळीच्या मुहुर्तावर रसिकांच्या भेटीला येणार आहे.