श्रद्धा कपूरची 'नॉस्टॅल्जिक' सोशल मीडिया पोस्ट; चाहत्यांनी जागवल्या 2000 च्या दशकातील आठवणी

भारताच्या प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. सणासुदीच्या काळात 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी ताज्या करण्यासाठी अभिनेत्रीने इंस्टाग्रामचा वापर करुन तिच्या चाहत्यांना त्या काळातील त्यांचे आवडते ट्रॅक शेअर करण्यासाठी प्रोत्साहित केले.

Updated: Dec 18, 2024, 05:04 PM IST
श्रद्धा कपूरची 'नॉस्टॅल्जिक' सोशल मीडिया पोस्ट; चाहत्यांनी जागवल्या 2000 च्या दशकातील आठवणी title=

भारतातील सर्वात लाडक्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रद्धा कपूरकडे तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याचं कसब आहे आणि तिची नवीनतम सोशल मीडिया पोस्ट त्याचंच उदाहरण आहे. या सणासुदीच्या काळात 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी ताज्या करण्यासाठी अभिनेत्रीने इंस्टाग्रामचा वापर करुन तिच्या चाहत्यांना त्या काळातील त्यांचे आवडते ट्रॅक शेअर करण्यासाठी प्रोत्साहित केले. याचा परिणाम म्हणजे संगीत, चित्रपट अर्थात स्वत: श्रद्धावरच्या तिच्या चाहत्यांच्या प्रेमाने भरलेलं कमेंट सेक्शन आणि त्यातून श्रद्धाच्या भूतकाळातील आठवणींना दिलेला उजाळा. 

श्रद्धाच्या पोस्टमधून तिचा आकर्षक लुक आणि खेळकरपणा पटकन व्हायरल झाला आणि श्रद्धाने लाखो लाईक्स तसेच हजारो कमेंटस् मिळवल्या. चाहत्यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीतील त्यांची आवडती गाणी उत्साहाने शेअर केली, "एक लडकी को देखा" आणि "तुने मुझे पहचाना नहीं" सारख्या गाण्यांचा उल्लेख चाहत्यांनी केला.

हे ही वाचा: शाहरुखच्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलं काम; आज आहे 'हा' सुपरस्टार

बऱ्याच जणांनी अशा नव्या मोहीमेचा आनंद घेतला, तर इतरांना जरी सहभागी होता आलं नसलं तरी श्रद्धावर कमेंट्सचा वर्षाव केला. 'तू पुन्हा मेकअप कर' आणि 'तुला इतके सुंदर दिसण्याची परवानगी आहे का?' यांसारख्या कमेंट्स तसेच 'आज क्या स्पेशल है, बबुडी?' सारख्या खेळकर कमेंट्सने श्रद्धाने आणि तिच्या चाहत्यांमध्ये बनलेले आनोखे बंध दाखवले.

94 मिलिअनहून अधिक फॉलोअर्ससह श्रद्धा कपूर ही सध्या इंस्टाग्रामवर भारतातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारी सेलिब्रिटी आहे. सर्व वयोगटातील चाहत्यांसाठी तिच्या पोस्ट्स हे प्रामाणिकपणा, विनोद आणि स्वच्छ मन यांच्या परिपूर्ण मिश्रण आहेत. तिची विचित्र 'कॅप्शन्स' असोत, स्पष्टवक्तेपणा असो किंवा आकर्षक संवाद असो, श्रद्धाची सोशल मीडिया उपस्थिती ती चाहत्यांची आवडती का राहते हे श्रद्धा सातत्याने सिद्ध करते.

या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट असलेल्या 'स्त्री 2' च्या यशाने हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी उल्लेखनीय ठरले आहे. श्रद्धाच्या अष्टपैलु व्यक्तिमत्त्वामुळे तिला एक निष्ठावान चाहतावर्ग मिळला आहे.