सुशांतच्या लहानपणीचा फोटो शेअर करत श्वेता म्हणाली...

सुशांत आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.    

Updated: Sep 28, 2020, 11:01 AM IST
सुशांतच्या लहानपणीचा फोटो शेअर करत श्वेता म्हणाली...

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या  आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर येत आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी एनसीबी कसून चौकशी करत आहे. दरम्यान सुशांतची बहीण श्वेतासिंहने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना तिने भावूक कॅप्शन देखील देलं आहे. 

'ते लुकलुकणारे डोळे...' असं म्हणत सुशांतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी देखील कमेंट दिल्या आहे. शिवाय सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे देखील लाल रंगाच्या बदामाचा इमोजी पोस्ट करत स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

श्वेताने त्यानंतर पुन्हा सुशांतचा हात जोडताना फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'प्रार्थना...कारण जेव्हा प्रार्थना ऐकली जाते, तेव्हा चमत्कार घडतात.' असं लिहिलं आहे. सुशांतने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे  येथील राहत्या घरी गळफास घेवून अत्महत्या केली. 

सुशांत आत्महत्या प्रकरणी आता सीबीआई (CBI), ईडी (ED), एनसीबी (NCB) या तीन केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. सुशांत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील 'ड्रग्स प्रकरण' सध्या चांगलचं गाजत आहे. या प्रकणाची साखळी दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे.