'अकाली मृत्यू'चं रहस्य उलगडणार श्वेता तिवारीच्या मुलीचा पहिला चित्रपट

आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत श्वेता तिवारीच्या मुलीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Updated: Sep 22, 2021, 09:24 AM IST
'अकाली मृत्यू'चं रहस्य उलगडणार श्वेता तिवारीच्या मुलीचा पहिला चित्रपट

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आणि बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री पलक तिवारी तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. तिच्या चाहत्यांसोबत कनेक्शन कायम ठेवण्यासाठी ती सतत प्रयत्न करत राहते. श्वेतापेक्षा अधिक सुंदर तिची मुलगी पलक तिवारी दिसते. पलक आता  बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पलक लवकरचं 'रोजी: द सॅफरन चैप्टर' (Rosie: The Saffron Chapter) चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पलकचा आगामी आणि पहिला चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

पलकच्या नव्या चित्रपटाचा खुलासा निर्माती प्रेरणा व्ही. अरोराने केला आहे. चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलताना चित्रपट निर्माते प्रेरणा म्हणाली, 'रोझी चित्रपट ऑक्टोबरमध्ये रिलीज होईल याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हा चित्रपट नोएडामध्ये घडलेल्या एका वास्तविक जीवनावर आधारित आहे आणि या चित्रपटातील आमचे मुख्य लक्ष 'अकाली मृत्यू' आणि त्यांचे कुटुंब आणि मित्रांवर होणारे परिणाम यावर आधारित आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

चित्रपटाचं चित्रीकरण पुणे, लखनऊ आणि इतर शहरांसह भारतातील विविध ठिकाणी चित्रीत करण्याच आलेली एक भयानक प्रेमकथा आहे. या चित्रपटात अरबाज खान, तनिषा मुखर्जी देखील आहेत आणि चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल रंजन मिश्रा यांनी केले आहे.