Shweta Tiwari on Her 3 Marriage and On Palak's Relationship : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, त्या दोघांनी ते चांगले मित्र असल्याचे नेहमी म्हटले आहे. पलकची आई श्वेता तिवारीनं यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिनं सांगितलं की अशा अफवांचा तिच्यावर काही फरक पडत नाही. त्याशिवाय डेटिंगवर जेव्हा काही अफवा किंवा चर्चा होतात त्यावर तिची पहिली प्रतिक्रिया काय असते याविषयी देखील तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.
श्वेता तिवारीनं सांगितलं की आता कोणत्याही अफवांचा मला त्रास होत नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये मला याची जाणीव झाली आहे की लोकं कोणतीही गोष्ट फक्त 4 तास लक्षात ठेवतात. त्यानंतर ते लगेच विसरून जातात, त्यामुळे कसली चिंता का करायची? अफवांप्रमाणे, माझी मुलगी प्रत्येक तिसऱ्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी दरवर्षी लग्न करतेय. इंटरनेटनुसार, आधीच मी तीन वेळा लग्न केलंय. या सगळ्या गोष्टींचा आता मला त्रास होत नाही, पण या आधी जेव्हा सोशल मीडिया नव्हतं तेव्हा मला त्रास व्हायचा. त्याचं कारण म्हणजे जेव्हा कोणत्या पत्रकाराला तुमच्याविषयी काही चांगलं लिहायचं नाही तेव्हा आपण काय करणार.
पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानच्या डेटिंगविषयी बोलायचं झालं तर पहिल्यांदा ते 2022 मध्ये एकत्र स्पॉट झाले होते. मुंबईच्या एका कॉन्सर्टमध्ये देखील ते अनेकदा एकत्र दिसलेत. त्यानंतर नेटकऱ्यांना विश्वास झाला की दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये होते.
दरम्यान, त्यानंतर 'सिद्धार्थ कन्नन'ला दिलेल्या एका मुलाखतीत पलक तिवारीनं स्पष्ट केलं की ते फक्त चांगले मित्र आहेत. त्यांनी म्हटलं की 'आम्ही बाहेर निघालोच होतो आणि आम्ही स्पॉट झालं. हे तिथेच संपतं. खरंतर आम्ही आमच्या ग्रुपसोबत होतो. फक्त आम्ही दोघे होतो असं नाही. लोकांना ही बातमी खूप आवडली होती पण तसं काही नाही आहे. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. तो खूप चांगला मुलगा आहे. आम्ही कधी-कधीच बोलतो आणि हे तितकंच आहे.'