...म्हणून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत Condom आणि ORS वाटले; पुण्यातील पबचा धक्कादायक खुलासा

पुण्यात पबच्या निमंत्रण पत्रिकेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. निमंत्रण पत्रिकेसोबत चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीटे वाटण्यात आली आहेत. याबाबत पबने खुलासा केला आहे.  

वनिता कांबळे | Updated: Dec 30, 2024, 04:50 PM IST
...म्हणून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत Condom आणि ORS वाटले;  पुण्यातील पबचा धक्कादायक खुलासा title=

Pune News : राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात एका पबच्या निमंत्रण पत्रिकेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीच्या निमंत्रणासाठी निमंत्रण पत्रिकेसोबत चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीटे देण्यात आले आहे. या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे. यानंतर  पबने याबाबत खुलासा केला आहे.  

पुण्यात नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पब कडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पब ने केला आहे.

हे देखील वाचा.... GK : असा पदार्थ जो शेतात हिरवा, बाजारात काळा आणि घरी आणल्यावर लाल होतो? 99 टक्के लोक उत्तर देऊच शकत नाही

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

"पुण्यातील मुंढवा या रेस्टॉरंट पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे," असे या पत्रात लिहले आहे. "अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे," असं सुद्धा या पत्रात नमूद आहे.