व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; जाणून घ्या हे घरगुती उपाय

व्हिटॅमिन B12 आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन B12 हा आपल्या शरीरातील असाच एक महत्त्वाचा पोषकतत्व आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेने हाडं कमकुवत होतात. फक्त हाडांना नाही तर या कमतरतेने अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. याच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांपासून आणि समस्यांपासून दूर राहण्यासाठी व्हिटॅमिन बी12 हे आवश्यक प्रमाणात शरीरात असायला हवे. जाणून घेऊया व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे आणि त्यावरील उपाय?

Updated: Dec 30, 2024, 05:42 PM IST
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; जाणून घ्या हे घरगुती उपाय title=
(photo-credited to social media)

 Vitamin B12 हे शरीरात महत्त्वाची कामगिरी करतात. डीएनए बनवणाऱ्या तंत्रिका पेशींच्या चांगल्या कार्यासाठी हे आवश्यक आहे. लाल रक्तपेशी बनवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी, अशक्तपणा दूर करण्यासाठी, शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हाडं व स्नायूंना ताकद देण्यासाठी कार्य करते. व्हिटॅमिन बी12 च्या अभावामुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी आपण काही घरगुती उपाय दूर करू शकतो.
 

व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेची लक्षणं -

1. थकवा जाणवतो आणि ऊर्जेची कमतरता जाणवतं
2. त्वचा फिकट किंवा पिवळी दिसते
3. मळमळ, उलट्या किंवा अतिसार होते
4. चक्कर येते
5. हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे
6. जीभ लाल होते
7. वजन कमी होणे

मुग डाळ एक सर्वोत्तम उपाय

आपल्यापैकी अनेक लोकांच्या आहारात 'मुग' या कडधान्याचा समवेश असतो. मुगाप्रमाणे मुगाची डाळ सुद्धा खूप आरोग्यदायी असते. मुगडाळ चवीला जेवढी छान लागते तेवढीच आरोग्यासाठी फायदेशीर असते. मुग डाळीत प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असतं. ते नव्या मांसपेशी तयार करण्यात मदत करते. मुग डाळीचं पाणी अँटीऑक्सिडेंट आणि मिनरल्सनी भरपूर असतं. रोज मुग डाळीचं पाणी प्यायल्याने व्हिटॅमिन बी12चा स्तर लवकर वाढतो. मुग डाळीचं पाणी सकाळी पिणे फायदेशीर ठरते. व्हिटामिन बी 12 हे पोषकतत्वं मासे, अंडी आणि मांस यांसारख्या पदार्थांपासून मिळते. त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12ची कमतरता सर्वात जास्त प्रमाणात असते. यावर उपाय म्हणून शाकाहारी लोकांनी मुग डाळीचा आहारात समावेश करणे योग्य ठरते.

आले आणि लिंबु

व्हिटॅमिन बी12च्या अभावापासून वाचण्यासाठी आले आणि लिंबू हेसुद्धा उपयुक्त पदार्थ आहेत. मांसाहार न करणाऱ्या लोकांना आले आणि लिंबू व्हिटॅमिन बी12चा स्तर वाढवण्यास मदत करतात. सकाळच्या वेळी कोमट पाण्यात आले आणि लिंबू टाकून प्यायल्याने व्हिटॅमिन बी12ची कमतरता दूर होते. ही एक आयुर्वेदीक पद्धत आहे.

दुग्धजन्य पदार्थांचा समावेश

दुग्धजन्य पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करायला हवा कारण हे पदार्थ व्हिटॅमिन बी12चा चांगला स्त्रोत आहेत. व्हिटॅमिन बी12ची कमतरता असलेल्या लोकांनी खरवस, साय, योगर्ट, लस्सी, दूध यांसारखे पदार्थ आवर्जून खायला हवे.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)