म्हातारी... म्हणणाऱ्यांना चाळीशीतल्या अभिनेत्रीनं दाखवला इंगा

कधी काळी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींनी आज चाळीशी पार केल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावं लागत.   

Updated: Mar 11, 2022, 04:32 PM IST
म्हातारी... म्हणणाऱ्यांना चाळीशीतल्या अभिनेत्रीनं दाखवला इंगा  title=

मुंबई : आज कलाविश्वात 40 वर्षांपुढील अनेक अभिनेत्री आहेत. कधी काळी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींनी आज चाळीशी पार केल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावं लागत. अभिनेत्री श्वेता तिवारी देखील या गोष्टीचा सामना करावा लागला आहे. एका मुलाखतीत श्वेता तिवाराने सांगितलं तिला कशाप्रकारे सतत वाढत्या वयामुळे ट्रोल केलं जात आहे... 

श्वेता म्हणाली, 'या सर्व गोष्टींमुळे मी प्रभावित होत नाही. जेव्हा मी ऐकते की मी म्हातारी होत आहे... तेव्हा मला आनंद होतो, मला असं वाटतं मी भाग्यवान आहे, की मी आता म्हातारी होत आहे...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्वेता पुढे म्हणाली, 'आता मला म्हातारी व्हायचं आहे. कारण मला माझ्या मुलांसोबत वेळ व्यतित करायचा आहे. सर्वांची काळजी मला घ्यायची आहे. एवढंच नाही मला जगायचं आहे....' 

मला 60, 70, 80 आणि 100 वर्षांपर्यंत जगायचं आहे. मला माझ्या नातवंडांसोबत खेळायचं आहे. त्यामुळे मला कोणी म्हातारी म्हणालं तरी वाईट वाटत नाही. असं देखील  श्वेता म्हणाली. श्वेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

फक्त श्वेता तिवारीचं नाही, तिची मुलगी पलक तिवारी देखील कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. श्वेता प्रमाणेचं तिची मुलगी देखील प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट आहे.