'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थला जीवे मारण्याची धमकी, 'या' पक्षाने नंबर लीक केल्याचा आरोप

धमकीचे फोन राजकीय पक्षाकडून येत असल्याचा सिद्धार्थचा आरोप 

Updated: Apr 30, 2021, 03:20 PM IST
'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थला जीवे मारण्याची धमकी, 'या' पक्षाने नंबर लीक केल्याचा आरोप

मुंबई : दक्षिण भारतीय सिनेमासोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थने नुकतंच एक ट्विट केलं आहे. हे ट्विट खूर चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये सिद्धार्थने त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं म्हटलं आहे. (Siddharth receives rape, death threats. BJP Tamil Nadu IT cell leaked my number tweets actor) एवढंच नव्हे तर त्याला फोन करून शिव्या देखील दिले जात आहेत. तसेच याबाबत सिद्धार्थने एका राजकीय पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. 

सिद्धार्थने ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'त्याचा खासगी फोन नंबर लीक करण्यात आलं आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवर लोकं त्यांना घाणेरड्या शिव्या देखील देत आहे.' यासोबतच सिद्धार्थने तामिळनाडू भाजपा आणि आयटी सेलला याबाबत जबाबदार धरलं आहे. 

सिद्धार्थने ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'माझा फोन नंबर तमिळनाडू भाजप मेंबर आणि भाजप तमिळनाडू आयटी सेलने लीक केला आहे. गेल्या 24 तासांत मला 500 हून अधिक शिव्या देणारे आणि धमकी देणारे फोन आले आहेत. तसेच माझ्या कुटुंबियांना देखील रेप कॉल्स येत आहेत.' हे सगळे नंबर रेकॉर्ड केले असून पोलिसांना दिले आहेत. मी गप्प राहणार नाही. प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना ट्विट टॅग केला आहे.