SidharthKiaraWedding : सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचा पहिला फोटो; रॉयल वेडिंग, रॉयल लुक

  “Ab humari permanent booking hogayi hai” असं कॅप्शन देत कियाराने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे (SidharthKiaraWedding) फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 

Updated: Feb 7, 2023, 11:07 PM IST
SidharthKiaraWedding : सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचा पहिला फोटो; रॉयल वेडिंग, रॉयल लुक  title=

Sidharth Malhotra and Kiara Advani share first photo of Wedding : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani ) यांनी अखेर लग्नगाठ बांधली आहे. : सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे (Sidharth Malhotra and Kiara Advani share first photo of Wedding).  कियारा अडवाणीने स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. “Ab humari permanent booking hogayi hai” असं कॅप्शन देत कियाराने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नातील फोटोंमध्ये सिद्धार्थ आणि कियाराचा रॉयल लुक पहायला मिळत आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. कमेंट्सच्या माध्यामतून चाहते या नवीन जोडप्याला भरभरुन शुभेच्छा देत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

बॉलिवूडचं हॉट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी  विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील जैसलमेरच्या सुर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी सात फेरे घेतलेत. या शाही विवाह सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा लग्नातील लुक कसा असेल याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. अखेर किरायने फोटो शेअर केले आहे. फोटोंमध्ये दोघांचाही लग्नात रॉयल लुक पहायला मिळते आहे. दोघांनी वेडिंग ड्रेसची ट्यनिंग केली आहे. लाईट मोती कलरच्या ड्रेसमध्ये दोघेही खूच सुंदर दिसत आहेत. 

 सिद्धार्थने लग्नात खास एन्ट्री घेतली होती.  'साजन जी घर आए'  या सुपरहिट गाण्यावर डान्स करत सिद्धार्थ लग्नमंडपात पोहचला.  कियारा सिद्धार्थचं खास पंजाबी स्टाईलने लग्न लागलं.  वरातीसाठी थेट दिल्लीतून बॅंडवाले बोलावण्यात आले होते. 

'शेरशाह' चित्रपटात सुपरहिट ठरेली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये देखील सुपरहिट दिसत आहे.