'ए जेंटलमॅन' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राचा डबल धमाका !

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Aug 2, 2017, 05:48 PM IST
'ए जेंटलमॅन' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राचा डबल धमाका !  title=

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा 'ए जेंटलमॅन' या त्याच्या आगामी हिंदी चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे. सिद्धार्थ या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. दुहेरी भूमिकेच्या बरोबरीने हा अ‍ॅक्शनपट असल्याने सिद्धार्थ अधिकच खुशीत आहे.

 

लंडनहून नुकत्याच परतलेल्या सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये सांगितल्यानुसार, 'ए जेंटलमॅन' हा चित्रपट पॉपकॉर्न अ‍ॅक्शन फिल्म आहे.'' या चित्रपटामधील दुहेरी भूमिकादेखील रंजक ट्विस्ट आणि टर्न  यांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे इतर  चित्रपटांमधील दुहेरी भूमिकांपेक्षा हा चित्रपट नक्कीच हटके असेल " असा सिद्धार्थचा विश्वास आहे.

 

"एकीकडे शांत स्वभावाचा मेहनती मुलगा, कष्टाने परिस्थितीवर मात करून उपाय शोधत आहे. तर दुसरीकडे आक्रमक स्वभावाचा, सतत लोकांशी झगडा करणारा मुलगा अशा दोन परस्पर विरोधी भूमिका साकारणं मला फारच आवडले" असेही सिद्धार्थ म्हणाला.

 

राज निदिमोरु आणि  डी.के कृष्ण  दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा सोबत जॅकलिन फर्नाडिस प्रमुख भूमिकेत आहे. " वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका आणि रंजक पटकथांसोबत अधिकाधिक काम करण्याची संधी मला मिळावी असा माझा प्रयत्न कायम असतो." असे सिद्धार्थ सांगतो. फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित 'ए जेंटलमॅन' हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.