Sidharth Malhotra 'शेरशाह' नंतर पुन्हा दिसणार वर्दीमध्ये... पाहा त्याची दमदार एन्ट्री

'जय हिंद...' 'शेरशाह' नंतर प्रेक्षकांना पुन्हा थक्क करण्यासाठी Sidharth Malhotra सज्ज... वर्दीमध्ये पुन्हा करणार दमदार एन्ट्री    

Updated: Apr 21, 2022, 09:04 AM IST
Sidharth Malhotra 'शेरशाह' नंतर पुन्हा दिसणार वर्दीमध्ये... पाहा त्याची दमदार एन्ट्री   title=

मुंबई : 'शेरशाह' सिनेमाच्या यशानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) पुन्हा एकदा अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता सिद्धार्थ दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा  पहिला टिझर प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आला आहे... ज्यामध्ये प्रेक्षकांना अभिनेत्याची सिनेमातील पहिली झलक पाहाता येणार आहे. 

टिझरमध्ये रोहित शेट्टी  स्वत: सेटवर कार आणि बंदुकांची चाचणी करताना दिसत आहे... त्यानंतर व्हिडीओच्या अखेरीस सिद्धार्थची दमदार एन्ट्री होताना दिसत आहे... सिनेमाचा टिझर खुद्द सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आगामी सिनेमाचा टिझर शेअर करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये, 'जेव्हा @itsrohitshetty ऍक्शन म्हणतात... तेव्हा तुम्हाला माहिती असेल त्याच शाब्दिक अर्थ काय असेल..' सीनेमाचा टिझर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रोहित शेट्टी आणि त्याच्या सिनेमांबद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर, ऍक्शन... ऑमेझोन प्राईमवर सिद्धार्थचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमात सिद्धार्थ कबीर मलिक या भूमिकेत दिसणार आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनंतर आता रोहित शेट्टी दिल्ली पोलिसांवर सिनेमा बनवत आहे. पण या सिनेमाबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.