मुंबई : गायिका कनिका कपूर अखेर कोरोनामुक्त झाली. पाच चाचण्यानंतर कनिकाचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. कनिकाला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तिला घरी सोडण्यात आलं आहे. मात्र पुढील १४ दिवस कनिकाला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितलं आहे.
कनिका कपूर २० मार्च रोजी लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रूग्णालयात कोरोनामुळे दाखल झाली होती. तब्बल १६ दिवसांनी तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून तिला घरी सोडण्यात आलं आहे.
Singer Kanika Kapoor has been discharged from Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGIMS), Lucknow after the report of her sixth test, came negative. (file pic) pic.twitter.com/LpWEuHyLls
— ANI UP (@ANINewsUP) April 6, 2020
घरी सोडल्यानंतरही कनिकाला १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्यास डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. आता कनिकाची तब्बेत व्यवस्थित आहे. तिच्या शरीरात कोरोनाची कोणतीच लक्षणं नाहीत. मात्र कोरोनामुक्त होऊनही तिला काळजी घेणं गरजेचं आहे.
बॉलिवूडमधील एक नामांकित नाव आहे. कनिकाने 'बेबी डॉल मैं सोने दी' हे प्रसिद्ध गाणं गायलं आहे. याव्यतिरिक्त काही रिऍलिटि शोमध्ये कनिका जज देखील होती. कनिका कपूर लंडनला गाण्याच्या कार्यक्रमानिमित्त केली होती. तेव्हा तिला कोरोनाची लागण झाली होती. मात्र तिने ही गोष्टी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतरही कनिका एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती. एवढंच नाही तर कनिकाने एका डिनर पार्टीमध्ये देखील सहभाग घेतला होता.