सेलिब्रिटीसोबत अजब प्रकार, पाहताच चाहते का किंचाळतात Omricon?

पाहून बसेल धक्का 

Updated: Jan 4, 2022, 11:26 AM IST
सेलिब्रिटीसोबत अजब प्रकार, पाहताच चाहते का किंचाळतात Omricon? title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कोरोना वायरस (Coronavirus)च्या नव्या व्हॅरिएंटनं सध्या संपूर्ण जगात एकच धुमाकूळ घातला आहे. त्यातच दर दिवशी या विषाणूबाबतची माहितीही समोर येत आहे. कोरोनाच्या विषाणूबाबत सध्या सुरु असणाऱ्या याच चर्चांमध्ये आता अशी एक बाब समोर आली आहे की भलेभले सेलिब्रिटी थक्क झाले आहेत. 

कोरोनाचा हा नवा व्हॅरिएंट ओमायक्रॉन (Omicron) एका अमेरिकन गायक आणि गीतकारासाठी डोकेदुखी ठरत आहे. 

अवघ्या नावांच्या साम्यामुळे त्याला या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

मी कलाकार आहे, कोरोनाचा व्हॅरिएंट नाही... 
ओमारियन  (Singer Omarion) नावाच्या एका गायकानं व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात असणाऱी शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. 

गेल्या बऱ्याच काळापासून आपल्या नावाची तुलना ओमायक्रॉनशी केली जात असल्याचं माझ्या कानावर आलंय. पण, या दोघांमध्ये काही फरक आहे असंच त्यानं स्पष्ट केलं. 

'नमस्कार... मी ओमारियन आहे. एक कलाकार आहे. कोणता व्हॅरिएंट नाही. लक्ष द्या तुम्ही रस्त्यावर माझ्यासोबत धावताय तर तुम्हाला विलगीकरणात रहावं लागणार नाही. 

इस सेलेब्रिटी के साथ है कुछ ऐसा, देखते ही लोग चिल्‍लाते हैं-'ओमिक्रॉन...'

माझ्या संगीतावर ताल धरण्यासाठीही तुम्हाला कोरोनाच्या निगेटीव्ह चाचणीचा अहवाल द्यावा लागणार नाही', असं तो म्हणाला. 

ओमारियन या गायकानं नुकतंच त्याचा एक अल्बन लाँच केला. ज्यानंतर त्यानं व्हिडीओ पोस्ट करत आपली कोरोनाशी तुलना करणाऱ्या, किंचाळणाऱ्या चाहत्यांना काही गोष्टी स्पष्ट करुन सांगितल्या.