Pulwama Attack : तुम्हाला दु:ख का होतंय?, सोनू निगमचा सवाल

नमस्ते नव्हे.... लाल सलाम

Updated: Feb 17, 2019, 08:28 AM IST
Pulwama Attack : तुम्हाला दु:ख का होतंय?, सोनू निगमचा सवाल

मुंबई : Pulwama Attack पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ प्रत्येकाने आपल्या परिने व्यक्त होत दहशतवादाचा नायनाट करण्याची मागणी केली. कोणी शहिदांच्या कुटुंबासोबत आपण उभं असल्याचं म्हणत त्यांना दिलासा दिला, तर कोणी शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. गायक सोनू निगम यानेही या हल्ल्यावर व्यक्त होत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून तो, 'तुम्हाला दु:ख का होतंय?' असा प्रश्न उपस्थित करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या त्याच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

'धर्मनिरपेक्ष लोकांनी या प्रकरणावर दु:ख व्यक्त नाही केलं पाहिजे. ही जबाबदारी तर फक्त हिंदुत्ववादी भाजप, आरएसएस या संघटनांवर सोडावी', असं उपरोधिकपणे तो या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. 'इथे तुम्ही भारत तेरे तुकडे होंगे... वगैरेच्याच घोषणा द्या. शहीदांप्रती तुम्ही दु:ख व्यक्त करु नका... हे तर सीआरपीएऐफचेच जवान होते यात कोणती मोठी गोष्ट नाही.... आणि हो आता इथे वंदे मातरम् वगैरे म्हणू नका, नमस्तेही म्हणू नका', अशा शब्दांत आपला संताप व्यक्त करत सोनूने व्हिडिओच्या शेवटी 'लाल सलाम' केला आहे. 

अवघ्या मिनिटभराच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तो ज्या प्रकारे व्यक्त झाला आहे ते पाहता अनेकांनीच सोनूच्या भूमिकेला दाद दिली आहे. धर्मनिरपेक्षांना ही सणसणीत चपराकच आहे, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. मानवाधिकारांसाठी झटणारी मंडळी आता कुठे गेली? जवानांना अधिकार नाहीत का? असं म्हणत आणा त्या धर्मनिरपेक्ष लोकांना समोर.... या शब्दांत पुलवामा हल्ल्याचा निषेध होत आहे. 

गुरुवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडून एक आत्मघाती हल्ला घडवण्यात आला. या हल्लायत सीआरपीएफच्या ४० जवानांना  त्यांचे प्राण गमवावे लागलले. सुरक्षा दलावर झालेल्या या हल्ल्याचा देशभरातून आणि इतर राष्ट्रांतूनही विरोध करण्यात येत असून, दहशतवाद्यांना आणि दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची मागणी करण्यात येत आहे.