वीकेंडला नाही पाहता येणार चित्रपट; आजपासून 10 दिवस सिनेमागृह बंद, काय आहे कारण?

सिनेमा पाहण्याचा प्लान करत असाल तर 17 मेपर्यंत थोडं थांबा... आजपासून पुढचे 10 दिवस सिनेमागृह बंद. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 17, 2024, 09:31 AM IST
वीकेंडला नाही पाहता येणार चित्रपट; आजपासून 10 दिवस सिनेमागृह बंद, काय आहे कारण? title=

2024 मध्ये बॉक्स ऑफिसची शुरुवात अतिशय थंड राहिली. साऊथचे काही सिनेमे अतिशय चांगली कमाई करताना दिसले. यामध्ये काही बजेट सिनेमांचा समावेश देखील आहे. तर काही सिनेमांनी मात्र निराशाच केली. मात्र आता पुढील 10 दिवस सिंगल स्क्रिन थिएटर्स आपलं शटर डाऊन करताना दिसणार आहेत. हे सर्व सिंगल स्क्रीन पुढील 10 दिवस बंद राहतील. कारण जे चित्रपट बनत आहेत ते चित्रपटगृहे उघडे ठेवण्याचा खर्च भागवू शकत नाहीत. त्यांना आणखी पैसे गमवायचे नाहीत, असे चित्रपटगृह मालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी आपली चित्रपटगृहे काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलंगणातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटरच्या मालकांनी पुढील 10 दिवस त्यांचे थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, 17 मे 2024 पासून सुरू होईल. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि लोकसभा निवडणुकांमुळे कोणताही चित्रपट निर्माते त्याचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करत नाहीत. जे प्रदर्शित होईल ते चालेलच की नाही याबाबत शाशंकता व्यक्त केली जात आहे. याचे परिणाम सिनेमालकांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे आता जूनपासून त्यांचे थिएटर पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.

झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अनेक स्टार्सचे जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आले. यामुळे त्यांचे नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा सिनेमागृह मालकांना होती. आता फक्त बिग बजेट चित्रपटच त्यांना या नुकसानीपासून वाचवू शकतात. यामध्ये प्रभासचा 'कल्की 2898 एडी', अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द रुल' आणि ज्युनियर एनटीआरचा 'देवरा' या चित्रपटांचा समावेश आहे. बॉलिवूडमध्येही आयपीएल आणि सार्वत्रिक निवडणुकांमुळे मोजकेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तेलंगणा राज्य सिंगल थिएटर असोसिएशनकडून सिनेमा हॉल बंद करण्याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

25 मे रोजी प्रदर्शित होणारे सिनेमे

25 मे रोजी काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात ‘लव्ह मी’, ‘गँग्स ऑफ गोदावरी’, ‘हरोम हारा’ आणि ‘सत्यभामा’ या नावांचा समावेश आहे. मर्यादित बजेटमध्ये बनवलेले हे छोटे चित्रपट आहेत. चित्रपटगृहे बंद राहिली तर हे चित्रपट कुठे प्रदर्शित होणार. हा मोठा मुद्दा आहे.