अंबानींच्या होणाऱ्या सुनेसोबत फोटोमध्ये दिसणारी ही महिला कोण? नातं ऐकून चक्रावून जाल

अंबानी कुटुंबात या महिलेचं प्रचंड महत्त्वाचं स्थान

Updated: Jul 4, 2022, 10:39 AM IST
अंबानींच्या होणाऱ्या सुनेसोबत फोटोमध्ये दिसणारी ही महिला कोण? नातं ऐकून चक्रावून जाल  title=
sister Dipti Salgaoncar clicked picture with mukesh ambanis daughter in law radhika merchant

मुंबई : (Reliance Groupof industries) रिलायन्स उद्योग समुहाला आता कोणत्याही प्रस्तावनेची गरज नाही. व्यवसाय क्षेत्रात या उद्योग समुहानं कमावलेलं नाव आणि त्यांची व्याप्ती पाहता हे यश आणि संपत्ती पाहणाऱ्यांना भारावून सोडत आहे. अशा या अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याबाबतही देशवासियांमध्ये कमालीचं कुतूहल. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात येत्या काळात आणखी एका खास व्यक्तीची एंट्री होणार आहे. ती म्हणजे अनंत अंबानी याची होणारी पत्नी, राधिका मर्चंटची. (sister Dipti Salgaoncar clicked picture with mukesh ambanis daughter in law radhika merchant)

काही दिवसांपूर्वीत राधिकाचा अरंगेत्रम सोहळा पार पडला. यावेळी बऱ्याच प्रसिद्ध आणि नामवंतांनी हजेरी लावली होती. कला जगतापासून उद्योगय विश्वातीलही बरेच चेहरे या सोहळ्याच्या वेळी पाहायला मिळाले. 

इथं एक अशीही व्यक्ती दिसली, जी सहसा सोशल मीडियावर फारशी नरजेस पडत नाही. पण, ती व्यक्ती अंबानी कुटुंबासाठी मात्र प्रचंड महत्त्वाची आहे. अंबानींची होणारी सून, राधिका मर्चंट हिच्यासोबतही ती फोटो काढताना दिसली. ही खास व्यक्ती म्हणजे धीरुभाई अंबानी यांची मुलगी आणि मुकेश अंबानी यांची बहीण, दिप्ती साळगावकर. 

दिप्ती साळगावकर यांच्यासोबत या सोहळ्याच्या वेळी त्यांचे पती, दत्तराज साळगावकर हेसुद्धा अंबानी कुटुंबीयांसोबत दिसत होते. दिप्ती ही धीरुभाई अंबानी यांची धाकटी लेक. 

व्यावसायिक दत्तराज साळगावकर यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. ते  V.M. Salgaocar Group of Companies च्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. दिप्ती यांना इशिता आणि विक्रम अशी दोन मुलंही आहेत. 

अंबानी कुटुंबातील काही सोहळ्यांच्या वेळी कुटुंबातील ही लाडाची लेक न चुकता हजेरी लावते. यावेळीसुद्धा मुकेश आणि नीता अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेला प्रोत्साहन देत तिच्या पाठीवर साबासकीची थाप मारण्यासाठी त्या उपस्थित राहिल्या होत्या.